सप्टेंबर २०२५

मुखपृष्ठाविषयी :  सप्टेंबर २०२५ 

या वेळेची मुखपृष्ठ छायाचित्रकार आहे अन्वी  वोहरा. आपल्या या छायाचित्राविषयी आणि एकंदरीतच आपल्या छायाचित्रणाच्या छंदाविषयी ती म्हणते…  As I bent down to take a picture of the Congress flower, a wave of silence passed over me. It was there, small, almost invisible, yet magnificent in its quiet brilliance. Its delicate,… Continue reading मुखपृष्ठाविषयी :  सप्टेंबर २०२५ 

संपादकीय : स्मरणरंजन: सप्टेंबर २०२५

‘फडक्यांच्या शब्दांत फडके’  आत्मनिवेदनात्मक इ. वाङ्मय  पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ   पु. रा.  भिडे आणि कंपनी लक्ष्मी रोड पुणे २  हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत आणि संपादन केले आहे आनंद नारायण नारळकर व कृष्णाजी गणेश भागवत यांनी.  ही या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आहे . मे १९४० हे प्रसिद्धीचे साल व महिना आणि… Continue reading संपादकीय : स्मरणरंजन: सप्टेंबर २०२५

दुर्लक्षित पुस्तके

विस्मृतीत गेलेले मोती    पहिले मराठी पुस्तक १८०५ साली प्रकाशित झाले. सुरुवातीला खूप कमी असलेला पुस्तकप्रकाशनांचा ओघ यथावकाश खूप विस्तारत गेला. सध्या एका अंदाजानुसार मराठीत दरवर्षी चार ते पाच हजार पुस्तके प्रकाशित होतात. आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एकूण संख्या प्रचंडच असणार. त्यांपैकी बहुसंख्य पुस्तके सुमार दर्जाचीच असतात आणि साहजिकच लगेच विस्मरणात… Continue reading दुर्लक्षित पुस्तके

काव्यचमत्कृती : गोमूत्रिका बंध

बांधुनि बंधांत विविध गोमूत्रिका बंध गोमूत्रिका बंध हे नाव वाचून जरा धक्का बसतो. या नावाचं स्पष्टीकरण असं – गाय, बैल सरळ चालत असतात पण त्यांच्या मूत्रविसर्जनाची धार  चतुष्पाद गतीमुळे नागमोडी होते.  त्या नागमोड्या गतीप्रमाणे वाचता येईल असा रचलेला हा बंध म्हणजे गोमूत्रिका बंध!  किरातार्जुनीयम् सर्ग १५ श्लोक १२ नासुरोऽयं न… Continue reading काव्यचमत्कृती : गोमूत्रिका बंध

कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

अव्यक्त … रितेपणात माझ्या हा पुष्प बहर खुलतो रेखून वेदनांना रंगात व्यक्त होतो हातात कुंचला जो थांबे कधी क्षणीक रचनेत त्या क्षणी तो अव्यक्त बंध येतो नजरेतूनी बघावी ऐशीच तान येते  त्या कल्पनेत आता तो तृप्त साज स्मरतो कधी तप्त रंग येती कधी कृष्ण गाज गाती चित्रातूनी मनीचा हा भाव… Continue reading कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

प्रश्नोपनिषद :सप्टेंबर २०२५ 

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  उच्च शिक्षणात पीएच.डी.ची डिग्री हा एक मानदंड मानला जातो.  एखादा विषय घेऊन त्याचा समग्र अभ्यास आणि त्यावर आधारित संशोधनाचा तो अंतिम टप्पा मानला जातो. ही पदवी मिळवणे हे अवघड असते किंवा कोणे  एके… Continue reading प्रश्नोपनिषद :सप्टेंबर २०२५ 

कथा : भाजीवाल्याची बायको 

नितीनने खिडकीतून डोकावून बघितलं. समोरच्या दुकानासमोरची जागा मोकळी होती. तो चरफडला. त्याने मागे वळून भिंतीवरचं घड्याळ बघितलं. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. एव्हाना शंकरने दुकान मांडायला हवं, आणखी उशीर झाला तर गिऱ्हाईक कमी होईल त्याचं, कळत कसं नाही याला? नितीन चिडचिडत राहिला.  “अहो, बरोबर पाचच्या आसपास खिडकीपाशी का उभे राहता… Continue reading कथा : भाजीवाल्याची बायको 

पुनरपि जननं : प्रकरण सातवे

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण सातवे

झुकझुक आगीनगाडी: भाग ७

माझा रेल्वेतील दिनक्रम व्यवस्थित चालू होता. हळूहळू, अनेक मुलींचे पालक मला एक योग्य स्थळ म्हणून पाहू लागले. ही कुजबुज माझ्या आईच्या कानावर पडू लागली आणि तिच्यातील वरमाई जागी झाली. अर्थात मुलाचे लग्न व्हावे आणि सुनेचे मुख पाहावे, ही तिची स्वाभाविकच इच्छा होती. माझेही लग्नाचे वय झाल्यामुळे मी फारसे आढेवेढे न… Continue reading झुकझुक आगीनगाडी: भाग ७

वाल्मीकीय रामायणातील पावसाळा  

आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वच वाचकांना, रसिकांना कालिदासाची आठवण येते. वाचने, व्याख्याने वगैरेंनी कालिदासदिन साजरा केला जातो. पावसाच्या धारा पाहताना मेघदूताची आठवण न होणारा रसिक विरळाच! पण केवळ रसिकराज कालिदासच नव्हे तर अंगावर वारुळ निर्माण होईपर्यंत तपश्चर्या करणारे ऋषी वाल्मीकीसुद्धा पावसाच्या धारांनी आनंदविभोर होतात, हे पाहून अंतःकरण भरून येते. कालिदासाने त्याच्या… Continue reading वाल्मीकीय रामायणातील पावसाळा  

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

अमेरिकेतील जपानी खाद्यसमाधी

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘उझुकी’ नावाचे एक जपानी रेस्टॉरंट आहे.हे  ‘उझुकी’  खूप खास आहे.  येथे  मिळणारी बकव्हीट नूडल्स फार प्रसिद्ध आहेत. ही बकव्हीट नूडल्स हाताने बनवतात. उझुकी  हा चौथा जपानी चंद्रमास. या महिन्यात जपानमधली फुले  फुलायला  सुरुवात होते. उझुकीमध्ये (Uzuki) सोबा मास्टर शुइची कोटानी (Shuichi Kotani) काम करतात. बकव्हीट नूडल्स बनवायला जगातील सर्वात… Continue reading अमेरिकेतील जपानी खाद्यसमाधी

वेडी माणसे

चित्रकार ज्या वेळी एखादे ऑन द स्पॉट स्केच करत असतो, त्या वेळी कितीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतात. त्या प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना कधी मनाला खूप आनंदी करून जातात; तर एखादी घटना मनाच्या आतपर्यंत खूप खोलवर जखम करणारी यातना देणारी असते. अशा वेगवेगळ्या घटनांचा चित्रनिर्मिती करताना नक्कीच प्रभाव पडत असतो.  चित्रकाराच्या… Continue reading वेडी माणसे

महुद ते ह्युस्टन : भाग ८ 

स्वप्ने, ध्येयनिश्चिती आणि पूर्तता यांचे महत्त्व आणि माझे सेवानिवृत्तीनंतरचे उपक्रम   हा विषय माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, म्हणूनच मी याबद्दल तुमच्याशी मनापासून बोलणार   आहे. आयुष्यातील कोणतीही मोठी उपलब्धी एका स्वप्नानेच सुरू होते. दुर्दैवाने, अनेक लोकांची स्वप्ने ही स्वप्नेच राहतात; कारण ती स्वप्ने मूर्त ध्येयांमध्ये बदलण्यासाठी ते कधीच प्रयत्न… Continue reading महुद ते ह्युस्टन : भाग ८ 

स्वागत : डाव मांडला… 

श्री.ध्रुव भट्ट  यांचा जन्म ८ मे १९४७ रोजी गुजरातमधील  भावनगर जिल्ह्यातील निंगाला येथे झाला. ध्रुव भट्ट हे गुजराती साहित्य विश्वात एक प्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्यात निसर्ग, समुद्र आणि मानवी जीवनातील गूढता यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. ध्रुव भट्ट यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी अनेक पुरस्कार… Continue reading स्वागत : डाव मांडला… 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

Leave a Reply