अमेरिकेतील जपानी खाद्यसमाधी

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘उझुकी’ नावाचे एक जपानी रेस्टॉरंट आहे.हे  ‘उझुकी’  खूप खास आहे.  येथे  मिळणारी बकव्हीट नूडल्स फार प्रसिद्ध आहेत. ही बकव्हीट नूडल्स हाताने बनवतात. उझुकी  हा चौथा जपानी चंद्रमास. या महिन्यात जपानमधली फुले  फुलायला  सुरुवात होते. उझुकीमध्ये (Uzuki) सोबा मास्टर शुइची कोटानी (Shuichi Kotani) काम करतात. बकव्हीट नूडल्स बनवायला जगातील सर्वात कठीण नूडल्सपैकी एक आहेत. ते करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी  ध्यानधारणा करण्याची प्रथा आहे. अशी ध्यानधारणा केल्याशिवाय पाकसिद्धी होत नाही असे समजले जाते. कोटानी हे स्वतः कुंभारकामदेखील करतात.  त्यांच्या या हॉटेलला वापरली जाणारी, क्रोकरी  त्यांनी स्वहस्ते  बनवलेली आहे. त्याचबरोबर याच रेस्टॉरंटमध्ये एका बाजूला ही क्रोकरी  विक्रीसाठीदेखील उपलब्ध आहे. बकव्हीट  हे प्रत्यक्षात धान्य नसून एका प्रकारच्या फळाच्या बिया आहेत. 

छायाचित्र सौजन्य : मिहीर जोशी, स्नेहल आपटे.

Author

Leave a Reply