मुखपृष्ठाविषयी : जुलै २०२५
yellow-spotted stink bug (Erthesina fullo), एर्थेसिना फुलो – ज्याला सामान्यतः यलो-स्पॉटेड स्टिंक बग किंवा यलो मार्मोरेटेड स्टिंक बग म्हणून ओळखले जाते – ही पेंटाटोमिडे कुटुंबातील स्टिंक बगची एक प्रजाती आहे. ही पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. ही आशियातील सर्वात जास्त प्रमाणात वितरित होणाऱ्या फायटोफॅगस कीटकांपैकी एक आहे आणि सफरचंद, चेरी,… Continue reading मुखपृष्ठाविषयी : जुलै २०२५
संपादकीय जुलै २०२५
चला पेंसील वापरू या आधी पाटी-पेंसील आणि नंतर शिसपेंसील यांनी आपल्या बालपणातल्या अनेक आठवणींत रंग भरले. पेंसील – तिच्या साधेपणात एक विलक्षण शक्तिशाली आणि बहुमुखी सर्जनशील साधन आहे. एका प्रकारे या दोन गोष्टींचे बोट धरून किंवा या दोन गोष्टी बोटांत धरून आपण मोठे झालो. आपल्या मनातले कागदावर किंवा पाटीवर … Continue reading संपादकीय जुलै २०२५
वैयाकरणी प्रा.यास्मिन शेख – शंभर नाबाद!
मराठीप्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार असे ज्यांचे वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख यांनी शनिवार, २१ जून २०२५ रोजी वयाच्या एकशेएकाव्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्या संध्याकाळी त्यांचा पुण्यात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते झालेला सत्कार हा सर्वच उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ… Continue reading वैयाकरणी प्रा.यास्मिन शेख – शंभर नाबाद!
कथा : कृष्णसर्प
प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅंप’ या पुस्तकासाठी २०२५ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक त्यांच्या मूळ कन्नड लघुकथा संग्रहाचे इंग्रजी भाषांतर आहे. या पुरस्काराने त्यांनी इतिहास रचला आहे; कारण : बुकर पुरस्कार मिळवणारे हे पहिले ‘कन्नड’ साहित्य आहे. लघुकथांच्या संग्रहाला हा पुरस्कार मिळण्याची ही… Continue reading कथा : कृष्णसर्प
कविता : जुलै २०२५
इतकीच प्रार्थना मी प्रार्थना करीत नाही देवा की माझी नौका सुखरूप ठेव वादळवाऱ्यात ती उलटीपालटी नको होऊ दे अचानक एखाद्या खडकावर आदळून तिचा चक्काचूर न होऊ दे सुसाट धारदार वाऱ्याने शिडाची लक्तरे नको होऊ देत तिच्यातील आम्ही सारे मजेत, आनंदात, सुखा-समाधानात प्रवास करू देत विशाल सागर, लखलखती रात्र आणि रमणीय… Continue reading कविता : जुलै २०२५
पुस्तक परीक्षण : कार्यकर्ता ,एका राजाची अद्भुत गोष्ट.
कार्यकर्ता : लोकसाधनेचं उत्तुंग स्वप्न साकार करणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांची आत्मकथा. लेखक : सुमेध वडावाला( रिसबूड) उन्मेष प्रकाशन पहिली आवृत्ती एक जून २०२५ मूल्य पाचशे रुपये. आत्मकथा हा केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा वृत्तांत नसून, तो मानवी अनुभवांचा, संघर्षांचा आणि त्यातून साधलेल्या प्रगतीचा एक आरसा असतो. हे आत्मकथन सुमेध वडावाला… Continue reading पुस्तक परीक्षण : कार्यकर्ता ,एका राजाची अद्भुत गोष्ट.
पुनरपि जननं : प्रकरण पाचवे
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण पाचवे
लाटा
विजू शेजारच्या वहिनींच्या घरी हॉलमधल्या कोचावर बसला होता. वहिनींची वाट पाहत होता. नेहमीचंच दृश्य. भिंतीवरचा टीव्ही. कोपऱ्यातली काचेची शो केस. त्यातले विजूला आवडणारे छोटे हत्ती. वहिनी आंघोळ आटपून हॉलमधे आल्या. टॉवेलने ओले केस पुसता पुसता विजूकडे बघून हसल्या. आज फार देखण्या दिसत होत्या वहिनी. त्या विजूच्या जवळ कोचावर येऊन बसल्या… Continue reading लाटा
संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला – रघुनाथ पंडित भाग ५
पंडित कवींचा काळ चार-साडेचारशे वर्षांपूर्वीचा. यानंतरच्या काव्यात हळूहळू गेयतेपेक्षा अर्थाला प्राधान्य आलं. अर्थप्रधान होण्याच्या प्रक्रियेत काही काव्यलेणी गळून पडली. सणावाराला पणजीबाईंची नथ हौशीनं घालावी तशी एखादी कविता सवृत्त, सालंकृत दिसू लागली. पंतकवींच्या काळातही अशीच प्रक्रिया घडली होती. ओवीतून बदल घडवत संस्कृत छंद, मराठी वृत्तं, अलंकारांमधून काव्य सजत गेलं. अलंकारांची… Continue reading संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला – रघुनाथ पंडित भाग ५
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१)
आकाशवाणीचं हे …. ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१)
झुकझुक आगीनगाडी: (५)
माझे सोलापूर आणि रेल्वे अशा अनेक सुधारणा करत करत मी सोलापूरच्या बदलीसाठी वाट पाहत होतो आणि तो एक दिवस आला. सोलापूर हे मध्य रेल्वेचे दक्षिण आणि उत्तर जोडणारे म्हणून आणि पेट्रोल/ डिझेल/मालवाहतूक आणि सिमेंटसाठीचे प्रसिद्ध असे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे सर्वच खात्यांवर इतर ठिकाणी असलेल्या खात्यांपेक्षा जरा जास्तीची … Continue reading झुकझुक आगीनगाडी: (५)
गंध-सुगंध
गंध-सुगंध माझ्या बेडरूमच्या खिडकीबाहेर एक फुलमाळीण आहे तिचे नाव आहे निशाराणी. या वेलीची इवलीशी फुले हेमंतात दिनकर अस्तास गेला की फुलतात. झुळकीबरोबर सुगंधी कळ घेऊन येतात आणि मला सुखावून जातात. (भावमुद्रा दुर्गा भागवत चवथी आवृत्ती २००४ मौज प्रकाशन). या पुस्तकातील सुगंधाची कळ या फुलबंधांत त्या लिहितात, ‘अगदी जुनी कथा आहे.… Continue reading गंध-सुगंध
महुद ते ह्यूस्टन : लेख ६
माझी शेलमधील कारकिर्द : (उत्तरार्ध)(ह्यूस्टन आणि अमेरिकेतील रिफायनरीज : सप्टेंबर २००६ ते २६ ऑक्टोबर २०१७)हा खूप मोठा कालावधी आहे, त्यामुळे मी शेलमधील माझ्या कारकिर्दीच्या अंतिम दोन टप्प्यांमधील काही महत्त्वाचे मुद्दे, प्रमुख आव्हाने आणि विजय, तसेच घरातल्या काही गोष्टी सामायिक करणार आहे.टप्पा ३ : शेल डीअर पार्क रिफायनरीमधील उत्पादन कार्य (अनुभव… Continue reading महुद ते ह्यूस्टन : लेख ६
आकांताच्या काठावर…
सक्काळीच फोन वाजला. आजींना दचकून जाग आली. कोणाचा असेल एवढ्या सकाळी फोन? या विचारात त्यांनी उशीखाली चाचपडत चष्मा शोधला, डोळ्यांवर चढवत किलकिल्या नजरेने स्क्रीनवर बघितलं; पण झोपेचा अंमल असलेल्या डोळ्यांना धुरकट दिसत होतं. मग त्यांनी तो चष्मा काढला आणि गाऊनच्या झालरीला पुसला. तोवर फोन वाजून वाजून गप्पच झाला. “मेल्यांनो,जर्रा म्हणून… Continue reading आकांताच्या काठावर…
कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?
नुकतीच आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर पायी वारी पार पडली. ठरलेल्या वेळी निघून ठरलेल्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरपूरला पोचल्या. लाखो वारकरी दोन्ही पालखी मार्गांनी चालत ‘विठ्ठल’ नामाचा आणि ‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम’ नामाचा घोष करत पंढरपुरी पोचले. अनेक वर्षांपासून मला वारीत चालत जाण्याची इच्छा होती. माझे वडील… Continue reading कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे
