yellow-spotted stink bug (Erthesina fullo),
एर्थेसिना फुलो – ज्याला सामान्यतः यलो-स्पॉटेड स्टिंक बग किंवा यलो मार्मोरेटेड स्टिंक बग म्हणून ओळखले जाते – ही पेंटाटोमिडे कुटुंबातील स्टिंक बगची एक प्रजाती आहे. ही पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. ही आशियातील सर्वात जास्त प्रमाणात वितरित होणाऱ्या फायटोफॅगस कीटकांपैकी एक आहे आणि सफरचंद, चेरी, नाशपाती आणि किवी यांसारख्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या फळांसह डझनभर यजमान वनस्पतींना खातात.या वेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत पंढरपूरचे श्रीकांत बडवे. निसर्गाचे आत्यंतिक प्रेम असलेला एक माणूस. निसर्ग,जुन्या वास्तु, देऊळे पाहण्यासाठी पंढरपूरच्या पंचक्रोशीत सायकलवरून भटकंती करणे हा त्यांचा आवडता छंद. पंचक्रोशीची त्यांची परिभाषा पंढरपूर पासून शंभर किलोमीटरची त्रिज्या धरून काढलेले वर्तुळ अशी आहे हे स्पष्ट केले पाहिजे. पंढरपूर परिसरात आढळणाऱ्या पक्षी आणि प्राणी यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची नोंद ठेवण्याचा ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. विदेशी पक्षी कोणता अधिवास पसंत करतात त्यावरही त्यांचे लक्ष असते. त्यांचे छायाचित्रण ते मोबाईल कॅमेरा वापरून करतात हे अजून एक वैशिष्ट्य ! निसर्ग आणि मानव यांच्या संतुलनातच ‘मुक्ती’ आहे हा त्यांचा विश्वास आहे !
