ऑगस्ट २०२३

मुखपृष्ठाविषयी

मुखपृष्ठ कलाकार आहेत  रेखा श्रीजीत.  त्या आपल्या कलाकृतीमधील स्त्री प्रतिमांविषयी लिहितात …  My woman I wanted the female figures in my paintings to be bold, caring, motherly as well as beautiful and sensuous at the same time. They are stylishly lissome. But the viewer would be making a mistake if… Continue reading मुखपृष्ठाविषयी

संपादकीय

   अंतर्नादची ही इंटरनेट आवृत्ती या अंकापासून सुरू होत आहे याचा आनंद खूप मोठा आहे. तिचे सारे श्रेय ज्यांनी या इंटरनेट आवृत्तीची सगळी जबाबदारी घेतली आहे त्या डॉक्टर अनिल जोशी यांनाच द्यायला हवे. मी हा लेख लिहीत आहे तो केवळ छापील ते इंटरनेट ह्या अंतर्नादच्या प्रवासाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी.     अंतर्नाद मासिकाचा पहिला… Continue reading संपादकीय

विक्रम वेताळ आणि संपादक

भानू काळे यांनी’ अंतर्नाद’ इ-आवृत्तीची धुरा सोपविली. छापील आवृत्ती ते इ आवृत्ती ही वाटचाल कशी झाली ते त्यांनी या अंकाच्या संपादकीयात सविस्तरपणे दिले आहे.  सुरुवातीला ही  धुरा मिळाल्यानंतर बरे वाटले परंतु नंतर ‘ घी  देखा लेकिन बडगा नही देखा’ अशी काहीशी अवस्था झाली.                      इ- आवृत्तीचा पहिला अंक प्रसिद्ध होताना  समोर अंतर्नादचा  दीपस्तंभ आहे.… Continue reading विक्रम वेताळ आणि संपादक

गुरु गोविंदसिंग

जफरनामा : विजयघोष  १  नुकतेच भारतीय शासनाने गुरु गोविंदसिंगांच्या अल्पवयीन पण तेजस्वी मुलांच्या बलिदानाची स्मृती गौरवान्वित करण्याच्या हेतूने २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिन म्हणून घोषित केला आहे. या बातमीविषयी मी इथे सिडनीत पूर्ण अनभिज्ञ होते. परंतु योगायोग असा की डिसेंबर २०२२ अखेरीस सिडनीमध्ये आल्यावर माझ्या मुलाने, मला `जफरनामा’चे गायन… Continue reading गुरु गोविंदसिंग

जफरनामा छन्द

(आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये  गुरु गोविंदसिंगांचे विचार किती मोलाचे आहेत हे सुजाण वाचकांच्या लक्षात यावे, गुरुगोविंदसिंगांच्या उदात्त, प्रभावी प्रबोधनाची, त्यांच्या अविचल श्रद्धेची आठवण जागी व्हावी, या हेतूने त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या दोन्ही पत्रांचे मराठी  अनुवाद इथे वाचकांसमोर ठेवते. जो समाज आपल्या इतिहासाला विसरतो आणि त्याने दिलेल्या शिकवणीकडे काणाडोळा करतो, त्याला त्याच इतिहासाची… Continue reading जफरनामा छन्द

पुनर्भेट नॅशनल पार्कची.. 

 ‘मी नॅशनल पार्कला पुन्हा आले त्याची गोष्ट’        १४.६.२०२३                                                   कालपर्यंत सगळीकडे उष्मा वाढला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या; पण आज सकाळपासून थंड वारे वाहू लागले. पांढऱ्याशुभ्र आकाशात कुठून कुठून काळे ढग जमा होऊ लागले . सकाळी नऊ वाजता रिमझिम पाउस पडू लागला. या पहिल्या पावसाच्या सोबतीने मी  संजय गांधी… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची.. 

मी टू

काकू बाहेरगावी गेल्या होत्या. काका घरी एकटेच होते.  आईने राणीला सांगितलं, “जा, त्यांना जरा हा शिरा देऊन ये. ”  दहावीचा अभ्यास बाजूला ठेवून राणी त्यांना शिरा द्यायला गेली. वाटी घेताना काकांचा हात तिच्या दंडावरून फिरला.  … चुकून झालं असेल! दुसरे दिवशी ‘थोडं दूध देता का,’ म्हणून काका विचारायला आले.  आई… Continue reading मी टू

पुस्तक परीक्षण

 ‘Politics is a dirty game,’ असे म्हणतात. सामान्य माणूस साधारणपणे राजकारणापासून दूर असतो. पण याच राजकारणात आपले भवितव्य आहे असे मानून पूर्णवेळ फक्त राजकारण हीच आपली कारकीर्द असे मानणारे  अनेक जण आपण बघत आहोत.तीनशे पासष्ट दिवस/ चोवीस तास राजकारण खरेच कष्टप्रद गोष्ट आहे आणि जरा जरी दुर्लक्ष झाले किंवा गाफील… Continue reading पुस्तक परीक्षण

संत पंत तंत – एक वाङ्मयीन प्रवास

लेख पहिला ज्ञानेश्वर ‘किं कवेस्तस्य काव्येन किं काण्डेन धनुष्मतः| परस्थ हृदये लग्नं न घूर्णयति यच्छिरः| ‘एखाद्या धनुर्धराने आपल्या बाणाने शत्रूच्या हृदयाचा  वेध घेऊन त्याचं मस्तक गरगरायला लावलं नाही; तसंच एखाद्या कवीने आपल्या काव्यातून रसिकाच्या हृदयात शिरून त्याला आपले शिर डोलवायला लावले नाही तर त्या बाणाचा आणि त्या काव्याचा काय उपयोग!’ … Continue reading संत पंत तंत – एक वाङ्मयीन प्रवास

रम्य ते बालपण ,रम्य त्या आठवणी

माझा जन्म देवासला झाला. हे शहर भारतातील मध्य प्रदेश ( पूर्वीचे  मध्य भारत), ह्या राज्यामध्ये असून माझ्या बालपणी ह्या संस्थानात पवार घराण्याचे राज्य होते. माझे पूर्वज दक्षिण भारतातील तंजावरच्या भोसले राजांच्या वंशातले. आमचे आडनावदेखील भोसलेच होते. पवार महाराजांच्या इच्छेनुसार आम्ही देवास येथे येऊन स्थायिक झालो. सुरुवातीला आमच्या पूर्वजांकडे महाराजांच्या देवस्थानाच्या… Continue reading रम्य ते बालपण ,रम्य त्या आठवणी

धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय

आज आपण डोळसपणे आजूबाजूला बघितले तर असे लक्षात येईल की हल्ली साईबाबा, स्वामीसमर्थ, गजानन महाराज यांच्या मंदिरांची संख्या वाढते आहे. तसेच सिद्धिविनायक, लालबागचा गणपती यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे जात आहेत. मठ व मंदिरांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत आहेत.  या निरीक्षणावरून,’भारतीय… Continue reading धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय

‘मला फक्त’

राखेतल्या ठिणगीसारखं मला विझायचं नसेल पण वीज बनून चमकायचंही नाहीये मला फक्त ज्योत बनून मंद तेवत राहायचंय मंद तेवत राहायचंय खोल सागरात मला बुडायचं नसेल पण उगीचच आकाशात उडायचंही नाहीये जमिनीला पाय टेकूनच मला पुढे जायचंय मला पुढे जायचंय… भले मला रावण बनायचं नसेल पण मला रामही बनायचं नाहीये मला… Continue reading ‘मला फक्त’

वेलकम जिंदगी….गले लगाले

आजपर्यंत अनेक साथी आल्या नि गेल्या. काही मुक्कामी राहून हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडल्या. कुठलीही नवी साथ अफवांच्या लाटेला सोबत घेऊन येते… वाऱ्याच्या वेगाने पसरणारी – मृत्यूच्या भीतीची साथ…  प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा एपमीडिया!  अफवांना नवनवीन पाय देणारे मोबाईलचे जाळे आणि बोटांचे चाळे! सेकंदाला हजार कि.मी. वेगाच्या अफवा! सोफ्यावरून हलू न… Continue reading वेलकम जिंदगी….गले लगाले

भय इथले संपत नाही….

पंढरपुरात काही दिवसांपूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.  पहाटे फिरायला निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेला,  जी रस्त्याच्या  उजव्या  बाजूने चालली होती तिला  समोरून भरधाव येणाऱ्या एका दुचाकीने उडविले आणि ती महिला जागीच गतप्राण झाली.ही बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. पहाटे घटकाभर फिरण्याइतकी सुरक्षितताही आपण आपल्या ज्येष्ठांना देऊ शकत नाही ही… Continue reading भय इथले संपत नाही….

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे

(१३-१०-१८७९ ते २७-११-१९५२) आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे. अनेकांसाठी तसं हे अनोळखी नाव. महाराष्ट्रातील काही अभ्यासक आणि विचारवंत वगळता या ज्ञानोपासकाची फारशी ओळख महाराष्ट्राला नाही. एकेकाळी ‘अग्निहोत्र मंदिर’, २८६ सदाशिव पेठ, पुणे (महाराष्ट्र) इथं या प्रकांड पंडिताचं वास्तव्य होतं. त्यांनी आयुष्यभर फक्त ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन केलं. हिंदुस्थानभर दौरे करून धर्म, तत्त्वज्ञान… Continue reading आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे

विनोबा वाणी

विज्ञानाने जीवनात केवळ  स्थूल परिवर्तन होते असे नाही; तर मानसिक परिवर्तन पण होत असते.  छापखान्यामुळे विज्ञानाचा किती सहजपणे प्रचार होऊ शकतो याची कल्पना आमच्या पूर्वजांना आलेली नसणार.  हे खरे, की त्या साधनांमुळे वाईट गोष्टींचाही प्रचार होऊ शकतो! परंतु जीवनाला वळण लावणाऱ्या वस्तू विज्ञानाने निर्माण होतात आणि वैज्ञानिकांनी जीवनाला वळण दिले… Continue reading विनोबा वाणी

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली

 मार्गदर्शक: भानू काळे

 संपादक: अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी

 व्यवस्थापन मंडळ: अजित  कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

22 thoughts on “ऑगस्ट २०२३

  1. अंतर्नाद अप्रतिम. प्रथमच नजरेखालून घातला. छान विषयबद्ध रचना. मी टू , देवास बालपण , विनोबा वाणी आणि भरपूर वाचनीय लेख एकंदरीत सर्व समावेशक अंक.

    1. फार छान झाला आहे अंक. नव्या युगात हे माध्यम योग्य आहे आणि त्यामुळे जगभर पोहोचता येईल. या प्रयोगाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
      आपण जुनी रचना कायम ठेवून continuity चा दिलेला अनुभव मोलाचा आहे.
      लेख, लेखक, विषय प्रथम दर्शनी आवडले. आता सविस्तर वाचतो.

      1. अंतर्नाद मासिकाच्या नव्या रूपाचे स्वागत, भानू काळे सर व त्यांच्या चमूस हार्दिक शुभेच्छा
        चैतन्य बारसावडे

      2. इ अंकाचा फायदा म्हणजे कुठेही (डॉक्टर, बँक….)वाट पहात असताना मोबाईल वर वाचता येते. व लगेच प्रतिक्रियाही देता येते.

  2. पहिलाच अंक इतका विविधतेने नटलेला आणि वाचनीय! नव्या स्वरूपातील अंतर्नादच्या पुढील यशस्वी वाटचालीची ही हमीच म्हणायला हवी. मनःपूर्वक अभिनंदन.

  3. अतिशय छान…! मनःपूर्वक अभिनंदन..!! पुढील भागही वाचायला आवडतील..कृपया मूल्य कळवावे..

      1. अंतर्नादची डिजीटल पुनर्भेट सुखावून गेली. या पहिल्या अंकातील लेख छान आहेत. श्नी भानू काळे आणि श्री अनिल जोशी यांचे हार्दिक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!

  4. फार छान झाला आहे अंक.
    हार्दिक शुभेच्छा!

  5. अंतर्नादच्या शेवटच्या अंकापर्यंत मी वर्गणीदार-वाचक होतो. अंतर्नाद बंद झाल्यापासून तो पुन्हा कधी सुरू होईल याची उत्कंठा लागून होती. आता डिजिटल का असेना अंक आलाय/येतोय याचा अत्यानंद आहे. श्री भानू काळे आणि श्री अनिल जोशी यांना खूप खूप धन्यवाद.
    @ॲड.लखनसिंह कटरे.

  6. दोन्ही संपादकीय लेख व “पुनर्भेट नॅशनल पार्कची” हे लेख वाचून झाले.
    अंकाचा दर्जा पाहिल्याइतकाच उत्तम आहे. या नवीन स्वरूपात हा अभिजात अंक सर्वत्र पोहचेल हा विश्वास व सदिच्छा.

  7. फार छान!

    कोणत्याही स्वरूपात अंतर्नाद वाचायला मिळणे हा फार आनंददायी अनुभव आहे!!

  8. अंतर्नाद ची ही पुन्हा होणारी भेट आनंददायी आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन.

    यासाठी शुल्क कसे द्यायचे? कृपया सांगावे.
    तसेच लेखन कुठे पाठवता येईल?

  9. अंतर्नाद, हा अंक वाचनीय आहे, paperless digital छान

  10. Heartiest congratulations for restarting the new issue of अंतर्नाद in digital form …Dr Anil and Team

  11. नमस्कार.
    अंकाचे मनपूर्वक स्वागत! छापील अंकाचा वर्गणीदार आणि जुन्या अंकांचे बाऊंड्स जवळ असणारा मी वाचक आहे.
    मला अंक नियमित मिळावा, ही विनंती.
    — विजय सबनीस, पुणे.

  12. परंपरा आणि नवता यांचा उत्कृष्ट मेळ.. सगळेच लेख वाचनीय. जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध. जगात कुठेही राहणाऱ्या मराठी माणसाला हे नियतकालिक वाचता येणे शक्य. मराठी संस्कृतीचा परीघ वाढला. या नव्या उपक्रमात स मनापासून शुभेच्छा.
    प्राचार्य श्याम अत्रे.

  13. अंतर्नादच्या नव्या स्वरूपाचे स्वागत! अंक छान आहे. खूप शुभेच्छा!

  14. अतिशय उत्तम आणि दर्जेदार विषय आहेत. अंतर्नाद पुन्हा सुरू झाल्याचे समाधान आहेच. स्वागत आणि शुभेच्छा. – रजनीश जोशी, सोलापूर

  15. Antarnaad is very nice and all articles are standard this is very best medium in computer age best of luck hardi subacha

Leave a Reply