‘मला फक्त’

राखेतल्या ठिणगीसारखं मला विझायचं नसेल
पण वीज बनून चमकायचंही नाहीये
मला फक्त ज्योत बनून
मंद तेवत राहायचंय
मंद तेवत राहायचंय

खोल सागरात मला बुडायचं नसेल
पण उगीचच आकाशात उडायचंही नाहीये
जमिनीला पाय टेकूनच
मला पुढे जायचंय
मला पुढे जायचंय... 

भले मला रावण बनायचं नसेल
पण मला रामही बनायचं नाहीये
मला फक्त माणूस बनून
क्षणभर जगायचंय
क्षणभर जगायचंय... 

मला फक्त...

Author

Leave a Reply