विनोबा वाणी

विज्ञानाने जीवनात केवळ  स्थूल परिवर्तन होते असे नाही; तर मानसिक परिवर्तन पण होत असते.  छापखान्यामुळे विज्ञानाचा किती सहजपणे प्रचार होऊ शकतो याची कल्पना आमच्या पूर्वजांना आलेली नसणार.  हे खरे, की त्या साधनांमुळे वाईट गोष्टींचाही प्रचार होऊ शकतो! परंतु जीवनाला वळण लावणाऱ्या वस्तू विज्ञानाने निर्माण होतात आणि वैज्ञानिकांनी जीवनाला वळण दिले आहे , यात काहीच शंका नाही.अग्नीच्या शोधानंतर सारे ऋषिगण  भक्तिभावाने अग्निगीते गाऊ लागले. ही गीते वेदांमध्ये आहेत कदाचित आता   अणुशक्तीचे गुणगान करणारे ऋषिगण निर्माण होतील. आज तरी अणुशक्ती संहार करण्यासाठी आली आहे. संहारकाच्या रूपातच ती आमच्या समोर उभी आहे.  परंतु ती केवळ रुद्ररूपच नाही,  शिवरूप पण आहे. जेव्हा ती शिव रूपाने प्रगट होईल तेव्हा जगाचे जीवनच बदलून जाईल. 

                           जीवनाला रूप देणारी दुसरी शक्ती आहे आत्मज्ञान.  जगाच्या पाठीवर जिथे जिथे आत्मज्ञानी जन्माला आले तिथे तिथे त्यांच्यामुळे सर्वच्या सर्व जीवन बदलून गेले.  येशू ख्रिस्त आले, गौतम बुद्ध आले , लाओत्से आले, मोहम्मद पैगंबर आले ,नामदेव आले ,तुलसीदास आले *मणिक्यवाचकर** आले.  ठिकठिकाणी असे महात्मे जन्मले.  अशा एकेका व्यक्तीच्या आगमनामुळे लोकांच्या जीवनाचे स्वरूप बदलून गेले.  लोकांच्या जीवनाचे स्वरूप बदलणारी ही दुसरी शक्ती आहे.   जगाला आकार देणारी तिसरी शक्ती आहे साहित्य.  वाल्मीकी आले ,व्यास आले, *डोंटे* आले होमर आले,  शेक्सपियर आले,  रवींद्रनाथ आले. असे थोर थोर पुरुष जगात आले आणि त्यांनी अशी वस्तू दिली की जिच्यामुळे जीवन नेहमीसाठी समृद्ध बनावे.  त्यांनी जगाला अशी विचारशक्ती दिली की ज्यामुळे जगाचे रूप पालटून गेले.  जगाला शांतीची गरज भासली तेव्हा  शांतीचा विचार दिला,  उत्साहाची गरज निर्माण झाली , उत्साह दिला. आशेची आवश्यकता  भासली- आशा  दिली. ज्यावेळी ज्या ज्या वस्तूची गरज भासली ती वस्तू त्यांनी समाजाला दिली.  जगात ज्या मोठ्या क्रांती झाल्या त्यांच्या मागे असल्या विचारकांचे विचारच होते **ज्यांनी पलीकडचे दर्शन होते अशा साहित्यिकांचे ते साहित्य होते.** 

** तामिळनाडूचे जुने भावकवी.  यांचा ‘ तिरुवाचकम्’ ग्रंथ प्रख्यात आहे.

Author

4 thoughts on “विनोबा वाणी

  1. मी विनोंबांचा अभ्यासू भक्त आहे.अनिल जोशी कृपया आपला फोन नंबर पाठवा.

  2. मी विनोंबांचा अभ्यासू भक्त आहे अनिल जोशी कृपया
    आपला फोन नंबर कळवा

  3. फार छान लेख आहे हा. जीवन समृध्द करण्यासाठी विज्ञान, आत्मज्ञान व साहित्य या गोष्टीचे किती सोप्या रितीने सांगितले आहे विनोबांनी व ते तितक्याच सहजतेने पोहचवले आहे लेखकाने!

Leave a Reply