नावात काय आहे? 

एकदा दुपारच्या उन्हात, भर तीन वाजता माझी आत्तेबहीण वाण्याच्या दुकानात गेली. तिने चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) घेतली. पैसे देत असताना तिला एक मैत्रीण भेटली.  ‘उन्हाची कुठे आलीस बिस्किटं घ्यायला?’ ‘अगं, आमच्या जोबीसाठी.’ ‘अय्या, तुम्ही कुत्रा कधी घेतला?’ —— चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) खाणारी, कुत्रा नाही ती – जोबी – म्हणजे मी.  नाव निवडताना माझ्या आईवडिलांनी जोडाक्षरांनी ठासून भरलेलं ‘ज्योत्स्ना’ हे नाव ठेवलं खरं, पण मी अमेरिकेत पाळणाघरात … Continue reading नावात काय आहे? 

मी टू

काकू बाहेरगावी गेल्या होत्या. काका घरी एकटेच होते.  आईने राणीला सांगितलं, “जा, त्यांना जरा हा शिरा देऊन ये. ”  दहावीचा अभ्यास बाजूला ठेवून राणी त्यांना शिरा द्यायला गेली. वाटी घेताना काकांचा हात तिच्या दंडावरून फिरला.  … चुकून झालं असेल! दुसरे दिवशी ‘थोडं दूध देता का,’ म्हणून काका विचारायला आले.  आई म्हणाली, “थांबा, मी पातेलीच देते.”  तिने दिलेली गरम दुधाची पातेली घेऊन राणी काकांकडे गेली. दूध … Continue reading मी टू