गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्‍या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात.  त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे अनेक फेस्टिव्हल भरत असतात, फक्त … Continue reading गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १

भारतीय साहित्य क्षेत्रात  सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित शब्दप्रभूंच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा वेध घेणारी नवी लेखमाला ‘अंतर्नाद’मध्ये सुरू होत आहे. या प्रतिभावंतांच्या लेखणीची महती आणि त्यांच्या साहित्यातील मर्म उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. ज्येष्ठ लेखक प्रमोद केशव बापट ही लेखमाला शब्दांकित करत आहेत. संपादक  साहित्यिक पुरस्कारांसंबंधात चार शब्द…. कोणत्याही क्षेत्रातील उत्तम कामगिरी पुरस्काराने गौरविली जाते; मग ते विज्ञान असो, सामाजिक क्षेत्र … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १

काफ्काची कथा ‘द बरो’ एक अन्वयार्थ    

‘द बरो’ ही काफ्काची अधुरी कथा. १९२३/२४ च्या हिवाळ्यात त्याने लिहिली. मराठीत ‘बरो’ चा अर्थ सामान्यपणे भुईखाली केलेले बीळ असा होतो. पण जुन्या इंग्लिशमध्ये ( १३००) ‘burgh’ म्हणजे कडेकोट बंदोबस्त असलेला किल्ला. या शब्दाला  १६०० मध्ये ‘भोक पाडणे’अशीही एक अर्थछटा आली  आणि  जुन्या इंग्रजी संदर्भाने त्याचा दुसरा एक अर्थ Castle असाही होतो. जर्मन भाषेतही  ‘burg’ म्हणजे ‘कॅसल’ या पासून बरो हा शब्द निर्माण झाला आहे.  … Continue reading काफ्काची कथा ‘द बरो’ एक अन्वयार्थ    

गोंयपण – थोडे टिकलेले, थोडे हरवलेले!

शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी मी गोव्यात पाऊल ठेवले ती माझी तेथील अगदी अलीकडची भेट. तिला निमित्त होते जवळचे स्नेही दत्ता दामोदर नाईक यांच्या सत्तराव्या वाढदिवसाचे. त्याच्या जोडीने गोव्यात थोडेफार भटकावे, काय-काय बदलले आहे ते बघावे हा माझा विचार. जिथे मी उतरलो तो मोपा विमानतळ हाच एक मोठा बदल होता. जेमतेम दोन वर्षांपूर्वी तो सुरू झाला होता. मोपा हे गावाचे नाव आणि प्रत्यक्ष विमानतळाला नाव दिले … Continue reading गोंयपण – थोडे टिकलेले, थोडे हरवलेले!

ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०

INECC (इंडियन नेटवर्क ऑन इथिक्स अँड क्लायमेट चेंज) हे  वंचित समुदायांच्या दृष्टिकोणातून हवामान बदलाच्या (Climate Change) मुद्द्यावर एकत्र काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचे एक राष्ट्रीय जाळे  आहे.  १९९६ साली भारतातील काही विकास व्यावसायिकांनी (Development Practitioners) याची सुरुवात केली. त्यांना हवामान संकट (Climate Crisis), शाश्वत विकास (Sustainable Development) आणि सामाजिक न्याय (Social Justice) यांतील असलेला थेट संबंध दिसला. हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधी वंचित बहुसंख्याकांच्या … Continue reading ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०

मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )

मन वढाय वढाय या ‘मानसिक आरोग्य’ या विषयावरील लेखमालिकेतील पुढील लेख हा जरा वेगळ्या, काहीशा अपरिचित परंतु सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे. Dementia म्हणजेच विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारा आजार! काही दिवसांपूर्वी जवळच्या एका खेडेगावातील सरपंचबाई मला भेटायला आल्या होत्या. त्या स्वतः पन्नाशीच्या आसपास होत्या आणि त्यांच्या सासूबाई ऐंशीच्या घरात. तर सासूबाईंना बरं  वाटत नव्हतं. त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. … Continue reading मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )

भारतीय शिल्पकला

भारतीय संस्कृतीत चौसष्ट कलांचा समावेश आहे.  त्यांतील एक महत्त्वाची कला म्हणजे शिल्पकला होय. सध्याच्या काळात  शिल्पकला काहीशी दुर्लक्षित वाटते.   आपल्या सर्वांना सिंधू संस्कृतीची ओळख आहे. या संस्कृतीतील मोहेंजोदारो, हरप्पा ही नगरे व  त्यांची आदर्श रचना आपणां सर्वांनाच माहीत असते.  या नगरांच्या उत्खननात मिळालेली नर्तिका, दाढीवाला पुरुष यांसारख्या मूर्ती व या शहराची एकंदरीतच रचना व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्नानगृहे शालेय जीवनात  आपण  अभ्यासलेले असते.      सिंधू संस्कृतीच्या नगरांच्या … Continue reading भारतीय शिल्पकला

गुजरातेतील पुणे – वडोदरा

    सुरत ते वडोदरा अंतर साधारण दीडशे किलोमीटर आहे पण रस्ता खूप चांगला असल्याने आम्हाला ते अडीच-तीन तासांत कापता आले. पूर्वी या शहराला आपण मराठीत बडोदे म्हणायचो किंवा इंग्रजीत बरोडा म्हणायचे पण त्यालाच १९७४ साली वडोदरा हे शहराचे मूळ नाव परत एकदा दिले गेले. या शहरात पूर्वी बरेच वटवृक्ष होते आणि त्यावरून वडोदरा हे नाव पडले होते असे म्हणतात. पण अजूनही बऱ्याच लोकांच्या तोंडी बडोदे किंवा … Continue reading गुजरातेतील पुणे – वडोदरा

तवाडा योको, जपानी – जर्मन लेखिका

  योको तवाडा (जन्म १९६०) या जपानी लेखिका सध्या बर्लिनमध्ये राहतात. यांचे हायस्कूलपर्यंत शिक्षण जपानमध्ये झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्या जर्मनीत स्थायिक झाल्या. उच्चशिक्षण जर्मनीत. ही माहिती नेटवरही मिळेल. मुख्य म्हणजे त्या जपानी आणि जर्मन दोन्ही भाषांत ललित तसेच वैचारिक लेखन करतात. मायबोलीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत लिहिणारे लेखक-लेखिका पूर्वी होऊन गेले आहेत; पण योको तवाडा जपानी तसेच जर्मन भाषेत लेखन करतात आणि दोन्ही भाषांतील लेखनाकरिता त्यांना दोन्ही … Continue reading तवाडा योको, जपानी – जर्मन लेखिका

बिनकाट्याचा गुलाब

२०२५ साल हे पु.ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे (दि.१२ जून २०२५) आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभाचे (दि. ३ जुलै २०२५) वर्ष आहे आणि चालू महिन्यात पु.लं. चा जयंती दिन (दि. ८ नोव्हेंबर) आहे. याचे औचित्य साधून पु. लं.च्या  बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जुळलेल्या ऋणानुबंधांचा धांडोळा घेणारा हा लेख ‘अंतर्नाद ’च्या नोव्हेंबर २०२५ च्या अंकात प्रसिद्ध करत आहोत. त्यासोबत पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या सर्जनशील सहजीवनाला अर्पण … Continue reading बिनकाट्याचा गुलाब