डिसेंबर २०२४

मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२४ 

या वेळचे  मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत  इचलकरंजी येथील स्वानंद कुलकर्णी. आपल्या छायाचित्राविषयी ते म्हणतात :  सोनटक्का पाहिला की जाणवते त्याच्या पाकळ्यांची नाजूक तलमता, हर्षद गंध, स्नेहल शुभ्रता, पारदर्शी नितळता आणि  रेशीमता.   फुले ही सोबत आनंदऋतू घेऊन येतात. दैनंदिन जगण्यातील ताणतणावांनी  खडबडलेल्या मनाला नाजूक तलमता देतात.  गंधहीन भावनांना हर्षदायी  सुगंध देतात. अंतरंगी… Continue reading मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२४ 

संपादकीय : मोजमाप शहाणपणाचे, सुज्ञपणाचे!

खरेच शहाणपणाचे मोजमाप होऊ शकते का ? शहाणपण ही शास्त्रीय संकल्पना आहे का पोकळ तात्त्विक चर्चेचा एक विषय? हुशारी आणि शहाणपण एकच आहेत का त्यांत काही फरक आहे? शहाणी माणसं हुशार असतात परंतु सर्व हुशार माणसे शहाणी असतातच असे नाही. वयपरत्वे शहाणपण वाढते असे म्हणतात; परंतु हुशारी तर वयानुसार कमी… Continue reading संपादकीय : मोजमाप शहाणपणाचे, सुज्ञपणाचे!

वाचकांना साद

वाचकांना साद   मंडळी नमस्कार, आभासी अंतर्नाद सुरू होऊन पंधरा महिने झाले. भानू काळे आणि छापील अंतर्नाद हे दोन दीपस्तंभ समोर होते. त्यांच्या प्रकाशातच ही वाटचाल झाली, चालू आहे व होईल. हा प्रयोग सुरू करताना मनात नाही म्हटले तरी धाकधूक होती. एकंदरीत प्रतिसाद पाहता हा प्रयोग स्थिरावला आहे असे वाटण्याइतपत परिस्थिती… Continue reading वाचकांना साद

केंपे गौडा ते सिलिकॉन व्हॅली (१)  

    रविवार, १० मार्च २०२४.     बंगळुरूच्या भूमीवर पाऊल टाकल्यावर प्रथम माझ्या नजरेत भरला तो नजरेच्या टप्प्यात मावू न शकणारा इथला भव्य विमानतळ. केंपेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे या विमानतळाचे अधिकृत नाव. केंपे गौडा या विजयनगर साम्राज्यातील होयसळ वंशाच्या एका पराक्रमी सरदाराने १५३७ साली या शहराची मूळ स्वरूपात उभारणी केली व म्हणून त्याचेच… Continue reading केंपे गौडा ते सिलिकॉन व्हॅली (१)  

कविता : निरोप

कशास आणि कोठून आलो माहित नाही माहित नाही…  कधी जायचे कसे जायचे कशास आणि कुठे जायचे माहित नाही माहित नाही…  अनंतातल्या अगम्य,अद्भुत प्रलयंकारी प्रवासात या एक सांगतो धुंद मनाने तृप्त मनाने जाता जाता पडावं इथला अगम्य होता अतर्क्य  आणि धमाल होता Continue reading कविता : निरोप

साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

१३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबंद नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले.  शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी… Continue reading साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

प्रतिसाद – डिसेंबर २०२४

अंतर्नादच्या मागच्या अंकात जयवंत दळवी यांच्या साहित्यावर एक अभिनव शब्दकोडे छापले होते. त्यात रसिक वाचकांनी दळवी यांच्या अफाट साहित्य कर्तृत्वाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन होते. त्या आवाहनाला माझा प्रतिसाद ! ‘जयवंत दळवींची महानंदा’ कथा,कादंबर्‍या,व्यक्तिचित्रण,नाटक,प्रवासवर्णन,विनोदी लेखन,पत्रकारिता अशा विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष… Continue reading प्रतिसाद – डिसेंबर २०२४

संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१३)

कवी विठ्ठल भाग ३ —अलंकार सौंदर्य आताच्या काळात कोणी वाचत नाही, लेखनास्वाद घेत नाही ही तक्रार नेहमी ऐकायला मिळते. आश्चर्य म्हणजे सोळाव्या शतकातला विठ्ठल कवीही ही तक्रार करतो. १२९/१२ (शावि) वाग्देवी! उदरानिमित्त सदरा म्यां पाहिल्या सुंदरापैं नोहे जठराग्निशांति विधुरा आला कलौ पाहरागर्भांधा बधिरापुढें श्रम पुरा तूं पावलीसी गिरा!हा माते! अपराध… Continue reading संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१३)

प्रश्नोपनिषद : डिसेंबर २०२४

प्रश्नोपनिषद :डिसेंबर  २०२४ मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   विविधतेत एकता या तत्त्वाने जगणाऱ्या आपल्या खंडप्राय देशाला एकत्र बांधणारे एक सूत्र किंवा अनेक सूत्रे कोणती याचा शोध विविध पातळ्यांवर वेळोवेळी घेतला जातो.  हे सूत्र एखादी संपर्क-भाषा असू शकते काय… Continue reading प्रश्नोपनिषद : डिसेंबर २०२४

पुस्तक परीक्षण: प्रा महालनोबिस नावाची संस्था

सांप्रत काळात तीन प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासाची मांडणी होताना दिसते. पहिले म्हणजे नेहरू व गांधी नावाचे व घराण्याचे खलनायकीकरण, दुसरे याच विचाराचे पुढचे पाऊल म्हणजे २०१४ पर्यंत या दोघांनी व काँग्रेसने देशाचे अपरिमित  नुकसान केले व तिसरे म्हणजे खऱ्या विकासाला देशात सुरुवात २०१४  नंतरच झाली असा भाबडा किंवा खरा विश्वास… Continue reading पुस्तक परीक्षण: प्रा महालनोबिस नावाची संस्था

ग्रंथयात्रा – एक प्रवास ११

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… मोलमजुरी करून शहरात जगणार्‍या लोकांचे अनुभव अत्यंत पारदर्शकपणे नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मांडले. सामान्य माणसाच्या कार्यशक्तीवर,… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास ११

अभिवाचन भाग १०

ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण  सुरू केली आहे.   लेखिकेचा परिचय…  १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड.  स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर… Continue reading अभिवाचन भाग १०

कविता : क्ष 

अनेक कंसांना सोडवूनसुद्धा नवनव्या कंसात अडकत गुणल्या भागल्याच्या अनेक उद्धट  प्रतिक्रियांना तोंड देत बेरीज वजाबाकीच्या पोरखेळातून  अनेक शून्यांना बगल देत  अनेकांच्या अनेक रितीने तेवढ्याच  मद्दडपणे  पायऱ्या उतरत वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ तरीही अनुत्तरित कशाला म्हणवून  घेतोस स्वतःला ‘क्ष’ ?  Continue reading कविता : क्ष 

आगामी – डिसेंबर २०२४

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading आगामी – डिसेंबर २०२४

पुस्तक परीक्षण : अभिषेकी

  चरित्र लेखन ही एक कला असून यात एका प्रकारे चरित्र लेखकाचा कस लागतो. चरित्र नायकाला सादर करीत असताना सत्यनिष्ठा आणि निष्पक्षपातीपणा किती पाळला गेला आहे त्यावर चरित्र चांगले झाले आहे की नाही ते ठरते. एखाद्या व्यक्तीच्या खासगी व सार्वजनिक आयुष्याचे सादरीकरण करणे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते. या प्रक्रियेत… Continue reading पुस्तक परीक्षण : अभिषेकी

इतिकर्तव्य

    रोजच्यासारखीच त्या दिवशी हिस्टोपॅथोलॉजीची (ऊतिविकृतिशास्त्र) ७-८ स्पेसिमेन्स आली. सोबत आलेले रजिस्ट्रेशन फॉर्म्स फक्त चाळले. आलेल्या नमुन्यात  वेगळं  असं  काही, मी ग्रॉसिंगसाठी जातीने उपस्थित राहायला हवं असं स्पेसिमेन  असावं असं त्या फॉर्म्सवरून तरी वाटलं नाही. माझ्या साहाय्य्क लेक्चररला  ग्रॉसिंग (बाह्यतपासणी) करून आवश्यक ते तुकडे तपासणीसाठी द्यायला सांगून मी तिथून गेले.… Continue reading इतिकर्तव्य

पुनर्भेट नॅशनल पार्कची १३ : फुलं, रेबीज आणि जेन गुडाल

   दिनांक  ८.११.२०२४                   ऑक्टोबर हिट संपली आणि गुलाबी थंडी हलक्या पावलांनी उद्यानात अवतरू लागली. ऑक्टोबरपर्यंत हिरवं असलेलं गवत हळूहळू सुकू लागलं. त्याचा रंग प्रथम पिवळा झाला आणि नंतर ते गडद तपकिरी रंगाकडे झुकू लागलं. वाऱ्याची झुळूक या गवतामधून सळसळत जाऊ लागली. नोव्हेंबर महिना हा रानफुलांचा महिना नसला तरी काही रानफुलं याही… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची १३ : फुलं, रेबीज आणि जेन गुडाल

साहित्यकोडे उत्तर – डिसेंबर २०२४

डॉ. विद्याधर पुंडलीक साहित्यकृती कोडेउत्तर१)सामोरी२)आजी शरण येते३)इतिहासाने लपविलेली एक कथा४)गुप्त वाट५)वाटा६)माळ७)दवणा८)विपरीत काही झालं नाही९)शेवटीऽऽ काय१०)गाय११)सती१२)अखेरची रात्र१३)पोपटी चौकट१४)माता द्रौपदी१५)कोनाडा१६)लांडगा आला रे आला१७)चकवा१८)चक्र१९)मांगल्याच्या ध्यासाचा नाजूक बळी२०)दूर कोपऱ्यातील बैरागी चाफा२१)अर्धूक२२)प्रवास२३)माझी झोपडी२४)अपार२५)जेव्हा पहाट होते२६)बोलावणं Continue reading साहित्यकोडे उत्तर – डिसेंबर २०२४

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली 

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

2 thoughts on “डिसेंबर २०२४

  1. उत्तम निर्मिती
    शक्य असल्यास संपर्क क्रमांक द्या
    संपादक
    मासिक ऋग्वेद
    9423277068

Leave a Reply