अनेक कंसांना सोडवूनसुद्धा
नवनव्या कंसात अडकत
गुणल्या भागल्याच्या अनेक
उद्धट प्रतिक्रियांना तोंड देत
बेरीज वजाबाकीच्या पोरखेळातून
अनेक शून्यांना बगल देत
अनेकांच्या अनेक रितीने
तेवढ्याच मद्दडपणे
पायऱ्या उतरत
वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ
तरीही अनुत्तरित
कशाला म्हणवून घेतोस
स्वतःला
‘क्ष’ ?
