भारत गायन समाज – भाग ३

लेखन अनुभवएका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचालपुणे भारत गायन समाजएक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास(भाग ३ ) आपण आपल्याच तंद्रीत चालत असावं आणि एका वळणावर अनपेक्षित मुक्कामी पोहोचावं, तसं मला या ग्रंथाचं लेखन करताना वाटलं. एक नाही, दोन नाही, अनेक दिवस. या वळणानं मला एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून दिली, दुरन्वये का होईना, गुरुवर्य भास्करबुवांशी जोडलं. हा केवळ योगायोग होता, की माझं विधिलिखित! माहीत … Continue reading भारत गायन समाज – भाग ३

झुक झुक अगीनगाडी… १ 

भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे एक  साधनमात्र  नसून ती भारताची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी  एक असलेली भारतीय रेल्वे, दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. ही रेल्वे केवळ लोकांसाठीच नाही, तर  भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. मालवाहतुकीतही  रेल्वेचा मोठा वाटा आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते. भारतीय रेल्वेचा इतिहास १६०  वर्षांहून अधिक जुना आहे. तेव्हापासून, आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रेल्वेने अनेक बदल पाहिले आहेत. … Continue reading झुक झुक अगीनगाडी… १ 

महुद ते ह्युस्टन: लेख २

मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण (जून १९७३ – जुलै १९७४) मी मुंबईतील रूपारेल महाविद्यालयात कसा पोहोचलो? एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आल्याने लाभलेल्या  वलयाचा  आनंद काही दिवस घेतल्यावर आणि पंढरपूर व पुण्यात काही सत्कार समारंभांना हजेरी लावल्यावर मला एक मोठा निर्णय घ्यायचा होता : महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठी पुणे की मुंबई? आणि मग, कोणते महाविद्यालय? दोन्ही शहरांमध्ये माझे बरेच नातेवाईक होते त्यामुळे वसतिगृहाचा प्रश्न नव्हता. मला पुण्यातील प्रसिद्ध … Continue reading महुद ते ह्युस्टन: लेख २

लेखन अनुभव : २

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग २) देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं संस्थात्मक कार्य समजून घेताना पुण्यात आणि एकूणच महाराष्ट्रात त्या वेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, हे विचारप्रवाह कसे होते, ते पाहणं आवश्यक वाटलं; कारण या विचारांना बाजूला ठेवून कलानिर्मिती-प्रगती-सांस्कृतिक संपन्नता यांचा विचार होऊ शकत नाही. ही सर्व क्षेत्रं परस्परपूरक … Continue reading लेखन अनुभव : २

संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १

दमयंती स्वयंवराच्या एका प्रतीवर लिहिलेलं नाव ‘चंदावरकर रघुनाथ’  म्हणजे ते चंदावरचे राहणारे असावेत!  काहींच्या मते तंजावरला पूर्वी चंदावर म्हणत;  म्हणजे रघुनाथ पंडित तंजावरच्या मराठी मंडळींपैकी असावेत.   काहींच्या मते  शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील पंडितराव म्हणजेच न्यायशास्त्री, राजव्यवहारकोशकर्ते अशी  राजकीय पदे भूषवत असतानाही आंतरिक काव्यप्रेरणा टवटवीत राखणारे हे रघुनाथ पंडित! काहींच्या मते त्यांचे गाव रायगड जिल्ह्यातील चौल! आडनाव मनोहर. चौलच्या फफे मनोहर घराण्यातही याची माहिती नाही.  मग पंडितांचे मूळ … Continue reading संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १

नवी दिल्ली साहित्यसंमेलन : लोकसाहित्याचा गौरव 

मराठी संस्कृतीचा ठसा देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथे पुरेसा उमटत नाही अशी आज अनेकांची भावना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात नवी दिल्ली येथे कुठलेही गंभीर वादंग निर्माण न होता पार पडले आणि त्याचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर लाभल्या होत्या याचाही आनंद … Continue reading नवी दिल्ली साहित्यसंमेलन : लोकसाहित्याचा गौरव 

मन वढाय वढाय : भाग ३

डिप्रेशन – नैराश्य गेल्या काही वर्षांपासून प्रगतीचा वेग सैराट झाला आणि आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींचा वेग बेफाम वाढला. शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी स्पर्धा, टेंशन असे शब्द परवलीचे झाले आहेत. धावाधाव फक्त शरीराची न राहता मनाचीसुद्धा होते आणि त्याबरोबर कुचंबणाही होते. बदलती जीवनशैली राहणीमान यांमुळे मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या जशा शारीरिक व्याधी जडतात तसेच चिंता, नैराश्य, ओसीडी असे विविध मानसिक आजारही जडतात. त्यांपैकी नैराश्य … Continue reading मन वढाय वढाय : भाग ३

जपान डायरीज (१)

आशिया खंडातील भारताचा अनेक वर्षांपासूनचा मित्रदेश – जपान. आपण या देशाबद्दल काही ना काही ऐकलेलं असतंच : टीव्ही, कारपासून ते पोकेमॉन, पिकाचूपर्यंत. माझीही अशीच काहीशी स्थिती होती काही वर्षांपूर्वीपर्यंत, थोडी  तोंडओळख होती जपानशी; कारण काही वर्षांपूर्वी मी जपानी भाषा थोडीशी शिकले होते. स्टेट बँकेच्या टोकियो ऑफिसला माझी नियुक्ती झाली तब्बल चार वर्षांसाठी आणि मी २०२२ सालाच्या गुलाबी थंडीत जपानमध्ये आले – तीन  वर्षांची मुलगी आणि … Continue reading जपान डायरीज (१)

हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

 गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग  आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम हे मुख्य ‘शास्त्रीय’ नृत्यप्रकार. केरळचे मोहिनीअट्टमही यांत धरायला हवे. हिंदी चित्रपटात लोकनृत्ये, पाश्चात्त्य नृत्यप्रकार यांशिवाय या प्रकारातील नृत्ये सादर झालीच. या लेखात काही उत्तम कथ्थक नृत्यांची ओळख करून घेऊ. ज्या प्रमाणे चित्रपटगीते जरी एखाद्या रागात बांधलेली असली तरीही त्यांत स्वातंत्र्य घेतलेले असतेच, त्यामुळे त्यांना रागावर ‘आधारित’ असेच म्हटले जाते; तसेच नृत्याच्या … Continue reading हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

मन वढाय वढाय : लेख २ रा

चिंता रोग…मनात उसळलेली दंगल माझ्या पहिल्या लेखाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. मानसिक आजारांची ओळख तर आपली झालीच आहे. सध्या परीक्षांचा काळ असल्यामुळे  यावेळी  चिंतारोग म्हणजेच स्ट्रेस हा विषय घेत आहे. “डॉक्टर मला खूप अस्वस्थ वाटतंय; काही सुचतच नाही; खूप टेंशन आलंय.” साधारणपणे ४५ वर्षे वयाचे जोशीकाका त्यांच्या पत्नीसोबत माझ्यासमोर बसले होते. सतत सुस्कारे सोडत होते. कपाळावर आठ्या डोळ्यांवर ताण स्पष्ट दिसत होता. … Continue reading मन वढाय वढाय : लेख २ रा