जपान डायरीज – २ : ऋतुचक्र – हिवाळा आणि वसंत
जपानमध्ये या वर्षीचा वसंत ऋतूचा सोहळा आत्ताच सुरू झाला आहे. इथे-तिथे, प्रत्येक ठिकाणी खूप फुले उमललेली आहेत. त्या निमित्ताने आज तुम्हांला इथल्या विविध ऋतूंची गोष्ट सांगते. जपानमध्ये चार ऋतू आढळतात. नावापुरते नाही तर अगदी प्रत्येक ऋतूचे वैशिष्ट्य जाणवते आणि बटण दाबल्यासारखा पुढचा ऋतू येऊन धडकतो. करड्या रंगाने वेढून टाकणारा हिवाळा, रंगांची बरसात घेऊन येणारा वसंत, भाजून काढणारा उन्हाळा, लाल पिवळ्या पानांनी रंगांची रांगोळी काढणारा शरद … Continue reading जपान डायरीज – २ : ऋतुचक्र – हिवाळा आणि वसंत
