मन वढाय वढाय : भाग ६  वा

स्किझोफ्रेनिया – भास ,भ्रम आणि भीतीचं त्रिकूट  आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया. आतापर्यंत आपण जे लेख वाचले ते चिंतारोग, नैराश्य या Neurosis या प्रकारात मोडणारे होते; म्हणजेच मानसिक आजार असला तरी त्या व्यक्तीची सारासार विवेकबुद्धी, निर्णयक्षमता इत्यादी गोष्टी शाबूत असतात. परंतु मानसिक आजारांमधील दुसरा प्रकार म्हणजे Psychosis – यामध्ये रुग्णाचे मानसिक संतुलन बिघडते, योग्य-अयोग्य असा सारासार विचार करता येत नाही.  यातील प्रमुख आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. याला … Continue reading मन वढाय वढाय : भाग ६  वा

संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

नळराजाचं कौतुक करताना रघुनाथ पंडितांना विलक्षण काव्यस्फूर्ती येते. पुन्हा पुन्हा नळाची स्तुती करताना रघुनाथ पंडित विविध दृष्टान्त, उपमादी अलंकार गुंफत राहतात.  या अलंकारांचं आणि स्तुतीचं निधान एकच असलं, अलंकारही पुनः पुन्हा तेच वापरले असले तरी कल्पनाचातुर्यामुळे ते रंजक ठरतात – कसे ते पाहू या!   प्रतीप अलंकार ज्याची उपमा द्यायची त्याचंच खुजेपण, कमीपण दाखवून देत उपमेयच कसे वरिष्ठ आहे हे दाखवत त्याचे कौतुक करणारा हा अलंकार!  … Continue reading संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

मन वढाय वढाय: भाग ५ वा

आत्महत्या रोखू या, मिळून सारे प्रयत्न करू या!     आत्महत्या म्हणजे स्वतःची हत्या! या विषयावर लिहिताना नेहमीच भावनिक व्हायला होतं. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता रोबिन्स विल्यम्सने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले ही बातमी ऐकली तेव्हाही असेच वाटले होते. प्रचंड यशस्वी, अतिश्रीमंत, अभिनयाची दैवी देणगी मिळालेला अभिनेता ज्याने त्याच्या अनेक चित्रपटांमधून आनंदी जगण्याचा संदेश दिला. त्याचा अंत नैराश्य म्हणजे डिप्रेशन या मानसिक आजाराने आणि आत्महत्येने व्हावा… किती … Continue reading मन वढाय वढाय: भाग ५ वा

महूद ते ह्यूस्टन ३

मुंबई  आयआयटीतील  शिक्षण (जुलै १९७४ – ऑगस्ट १९८१) आयआयटी मुंबई  बी.टेक. वर्षे (जुलै १९७४ – एप्रिल १९७९) आयआयटीचे पहिले चार सेमिस्टर सर्व शाखांसाठी समान होते – यात मूलतः सर्व अभियंत्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध मूलभूत विषयांचे अनेक अभ्यासक्रम : गणित (४ अभ्यासक्रम), भौतिकशास्त्र (५), रसायनशास्त्र (४), अभियांत्रिकी रेखाचित्र (२) यासोबत इंग्रजी आणि मानव्य शाखा  (तर्कशास्त्र, नैतिकता इ.)शिकवले जायचे.  पहिल्या सेमिस्टरच्या शेवटी, माझे GPA  (Grade Point Average) … Continue reading महूद ते ह्यूस्टन ३

झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

   रेल्वेमध्ये नोकर भरतीचे विविध प्रकार आहेत : १ रेल्वे भरती मंडळ (RRB) / भारतीय प्रशासनिक सेवा (UPSC)  यांच्याद्वारे  २ कला/खेळ  विशेष प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची थेट भरती   ३ अनुकंपा तत्त्वावर भरती    ४ SCOUTआणि GUIDE यांत प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना प्रवेश  ५ इतर सक्षम अधिकारान्वये जेव्हा  सरळ क्र. १ द्वारे भरती होते तेव्हा पात्र उमेदवाराला  त्या खात्याबद्दल काही महिने/वर्षे  प्रशिक्षण  दिले जाते आणि मगच खातेनिहाय परत परीक्षा घेऊन … Continue reading झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

 संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

रघुनाथ पंडित भाग २ आधीच नैषधकथा नवनीत भेलाहोता अलंकरणरूप इच्या जिभेला… ||१०४||रघुनाथ पंडितांच्या काव्यपंक्तीतील हा छोटासा भाग नलदमयंती स्वयंवराचं मूळ काव्य आणि रघुनाथ पंडितांनी तिच्यावर चढवलेल्या अलंकारांचं रूप दाखवतं. लोण्याचा गोळा असावा अशी ही मृदू कथा आणि तिने परिधान केलेले अलंकार आणि आभूषणं!अलंकार हा शब्द कसा आला? संस्कृतात अलम् हे भूषणवाचक अव्यय आहे. कृ म्हणजे करणे — अलंकृत करणे. साध्या वाक्यांना अलंकार चढवले की मूळ … Continue reading  संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली

विनय पांडुरंग उत्पात हे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत.  विविध वृत्तपत्रांमधून कायदेशीर बाबींबद्दल ते स्तंभलेखन करतात.  त्यांच्या पुण्यनगरी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये  प्रसिद्ध होणाऱ्या ‘विधी भाष्य’ या लेखमालिकेला वाचकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकिर्दीत मिळालेल्या अनुभवांवर आधारित ही खास लेखमालिका ते या महिन्यापासून लिहीत आहेत – संपादक  कथा पहिली : मूर्तिमंत ‘नीतिमत्ता’        एकंदरीत न्यायालय, न्यायाधीश, वकील, पोलीस, पुरावे यांविषयी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला आकर्षण असते व … Continue reading ॥अथातो न्याय जिज्ञासा।। कथा पहिली

कवितेचे पान : अघटितांचं घटित

जग अनेक अनाकलनीय घटितांनी, अक्रितांनी भरलेलं आहे यावर माझा लहानपणापासून विश्वास आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की मुक्ततेच्या आनंदाच्या हातात हात घालून आणखी एक आनंद यायचा तो म्हणजे आजी आजोबांकडून किस्से कहाण्या ऐकण्याचा. याची तयारी संध्याकाळपासूनच होई. तुळशीच्या अंगणात भरपूर पाणी टाकायचं. तापलेलं अंगण निवलं की बाजा टाकायच्या. गाद्याबिद्या पद्धतशीर घालून आम्ही अधीरपणे आजोबांची वाट पाहायचो… मग सुरू व्हायचा गप्पा, किस्से यांचा दौर! रात्री डोळ्यांवर झोप उतरेपर्यंत … Continue reading कवितेचे पान : अघटितांचं घटित

दक्षिणचित्र

   चेन्नईपासून २५ किलोमीटर अंतरावर, मम्मलापुरमच्या वाटेवरच लागणारे ‘दक्षिणचित्र हेरिटेज म्युझियम’ प्रवाशांनी आवर्जून बघावे अशी शिफारस मी करेन. या म्युझियमची पूर्वी आम्हांला काहीच माहिती नव्हती. अगदी आयत्या वेळी आणि वाटेवरच असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि मागे वळून बघताना तो अगदी योग्य होता असे वाटते.    आंध्र आणि तेलंगणा मिळून पूर्वीसारखे एकच राज्य पकडले, तर आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ही विंध्य पर्वताखालची चारही राज्ये द्रविड … Continue reading दक्षिणचित्र

मन वढाय वढाय भाग ४ 

महिलांचे मानसिक आरोग्य भारतीय संस्कृतीमध्ये ऐश्वर्य देणारी श्रीलक्ष्मी , बुद्धिदेवता सरस्वती आणि आदिशक्ती पार्वती या सर्व स्त्रीदेवता आहेत. म्हणजेच एकीकडे दगडातील स्त्रीला आपण देवत्व प्रदान करतो पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जिवंत स्त्रीला मात्र आपण दुय्यम ठरवतो, तिच्यावर अनन्वित अत्याचार करतो.आज महिलांचे मानसिक आरोग्य याविषयी लिहिताना ‘तिच्या ‘आयुष्यातील टप्पे आणि तिचे मानसिक आरोग्य यांच्यातील परस्पर संबंध आपण बघणार आहोत. भारतात एकूणच मानसिक आरोग्याबद्दल फारशी जागरुकता नाही … Continue reading मन वढाय वढाय भाग ४