जुलै २०२६

मुखपृष्ठ जुलै २०२६ :

मी छायाचित्रे घडवतो. शहरात राहतो खरा मी, पण जंगलातून फिरण्याची सदैव ओढ लागलेली असते. स्वच्छ हवा, मनमोहक निसर्गदर्शन, वैविध्यपूर्ण प्राणिपक्षिदर्शन या साऱ्यांमुळे मन कसे प्रसन्न, आनंदी होते. फोटोग्राफीची आवड आणि काहीसे कौशल्य आहे आणि अत्याधुनिक चांगले कॅमेरे माझ्याकडे आहेत, त्यामुळे मग छायाचित्रे घडवतो. माझ्या गुरूने मला अनेकदा सांगितले आहे, “फोटो काढायचे नाहीत, घडवायचे!” त्या सूचनेनुसार… Continue reading मुखपृष्ठ जुलै २०२६ :

संपादकीय : मराठी व्याकरणाचा इतिहास समजावून घेताना…

ख्यातनाम संस्कृतज्ञ आणि मराठी व्याकरणाचे अभ्यासक प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर हे स. प. महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ येथे कार्यरत होते. अर्जुनवाडकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांच्या एका ऐतिहासिक पुस्तकाबद्दल…  संपादक     ‘या समाज माध्यमांचे व त्यांच्या अतिवापराचे करायचे काय?’ या प्रश्नाने हळूहळू विक्राळ स्वरूप धारण केले आहे यात काही शंका नाही; परंतु या… Continue reading संपादकीय : मराठी व्याकरणाचा इतिहास समजावून घेताना…

कथा : ऊमन्डे

बेल वाजली आणि मी दार उघडले. या घटनेत काहीच विचित्र नाही. मग मला का सारखे असे वाटत आहे, की मी काहीतरी खूपच विचित्र केले आहे! तशी वेळ सकाळचीच होती, पण… अरे वेळ तर सकाळचीच आहे, मग पणचा प्रश्नच नाही ना. मग असे का होतेय?  काय होते माहिती आहे का? आमच्याकडे मला रोज सकाळी चार चहा… Continue reading कथा : ऊमन्डे

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ६

 अमृता प्रीतम : भारतीय साहित्यातील एक लखलखते आणि बंडखोर नाव  मल्याळम, तेलगू , कन्नड आणि मराठी या चार भाषांमधील साहित्यिकांचा परिचय करून घेतल्यानंतर आपण आज पाचव्या भाषेतील लेखकाला भेटणार आहोत आणि ‘पाच नद्यांचा प्रदेश’ – पंजाबमधील ते सर्वपरिचित नाव आहे अमृता प्रीतम यांचे. त्यांना १९८१ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. आजच्या भारतातील पंजाबी भाषकांची संख्या… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ६

बुद्धिवादाची शोकात्मता 

 बुद्धिवाद म्हणावे, की बुद्धिप्रामाण्यवाद हा प्रश्न आधी सोडवून घेऊ. माहीत नसलेल्या गोष्टीला कल्पना, विश्वास, श्रद्धा हे प्रमाण न मानता प्रत्यक्ष बौद्धिक अस्तित्व असेल तरच ती गोष्ट मान्य करणे, याला म्हणू बुद्धिप्रामाण्यवाद. हा प्रकार खरे-खोटे, सत्य-असत्य यांच्याशी प्रामुख्याने संबंधित आहे. पण, याच्याही पुढे जाऊन मानवी जगण्यात बुद्धी हाच फक्त एकमेव पाया असतो आणि माणसाचे एकूण जगणेच… Continue reading बुद्धिवादाची शोकात्मता 

पुनरपि जननं : भाग १७

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं : भाग १७

वाचन संस्कार संवर्धन : अस्वस्थतेकडून आश्वस्ततेकडे 

 साताऱ्यात असताना कॉलेजच्या वार्षिक अंकासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत घेतली. मुलाखत खूप चांगली झाली. पुढे विद्यापीठाने या मुलाखतीला पारितोषिक देऊन सन्मानित केले. ही मुलाखत घेत असताना डॉक्टरांच्या वागण्याबोलण्यातील, राहणीमानातील साधेपणा खूप भावला. त्यांच्या कामाचे मोठेपण लक्षात आले. या भारावलेपणातच माझ्याकडून एकही रुपया न घेता त्यांनी मला साधनेचा वर्गणीदार करून घेतले. पुढे मी हमीद सरांमार्फत  साधनेकडे … Continue reading वाचन संस्कार संवर्धन : अस्वस्थतेकडून आश्वस्ततेकडे 

मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

रामाविषयीची भक्ती व्यक्त करण्यासाठी १९०० कडव्यांचं मंत्ररामायण लिहूनही मोरोपंतांचं समाधान झालं नाही. कॅलिडोस्कोपमधून  विविध कोनांतून वेगवेगळ्या आकृती निरखाव्यात तसं मोरोपंत वेगवेगळ्या कोनांतून रामायण निरखत होते. मंत्ररामायणाप्रमाणे बालमंत्ररामायणातही श्रीरामाचा जप त्यांनी गुंफला आहे.   बालमंत्ररामायण हे  रामाच्या लहानपणीचे वर्णन नसून ते केवळ ३९ कडव्यांचे लहानसे रामायण आहे म्हणून या काव्याला बालमंत्ररामायण संबोधले आहे.  मंत्ररामायण आणि बालमंत्रारामायण… Continue reading मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

 वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

भारतीय जनमानसावरचे रामकथेचे गारुड केवळ असामान्य आहे. कितीही वेळा वाचली, पाहिली, तरी मन भरत नाही, अशी ही कथा. त्यामुळे अनेक लेखकांकडून तिच्याविषयी लिहिणे हे घडत आलेले आहेच. आजही तिच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल लिहिले जाते. ती कथा आपल्या भाषेत लिहिणे, एवढेच नव्हे तर आपल्या मनाप्रमाणे तिच्यात काही बदल करून लिहिणे, शिवाय तिच्यात अन्य कथा रचून मिसळणे वा… Continue reading  वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

आगामी – भारत भ्रमण : एक कोलाज

आपल्या भारत  देशात असलेली थक्क करून सोडणारी विविधता आणि त्या विविधतेला बांधून ठेवणारी एकता यांचे अनुभव शब्दबद्ध करीत आहेत अंतर्नादकार भानू काळे.   भारतभर प्रवास करून सिद्ध झालेला हा वेगळा अनुभव पुस्तक रूपात लवकरच येत आहे.  “Many pieces, One picture.” Continue reading आगामी – भारत भ्रमण : एक कोलाज

डॅडी नावाचा दोस्त

 पुण्यातील सुप्रसिद्ध  लक्ष्मी रस्त्याचा मूळ पिंड जसा व्यावसायिक, तसा टिळक रस्त्याचा मूळ पिंड शैक्षणिक. अनेक प्रसिद्ध शाळा, कॉलेजेस टिळक रस्त्यालगत विद्यादानाचं काम करतायत. शाळा,कॉलेजेसबरोबर येतात ते अनेकविध व्यवसाय. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खाण्याचे तर्‍हेतर्‍हेचे जिन्नस विकणाऱ्या म्हणून सुरू झालेल्या खाणावळी, हॉटेल्सबरोबरच छोट्या-मोठ्या बेकरीही सगळ्यांच्याच उपयोगाच्या. हे व्यवसाय चालवणारी माणसं मग अशा नगरीच्या शोधात कुठूनकुठून येतात. इथे काम… Continue reading डॅडी नावाचा दोस्त

चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

मराठी काव्याच्या इतिहासामध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पाहायला मिळते. ती परंपरा आहे द्रौपदीच्या धाव्यांची. वस्त्रहरणप्रसंगी द्रौपदी श्रीकृष्णाचा धावा करते आणि तो तिच्या मदतीकरिता अवतरतो, हे साधारण कथानक. जेव्हा दुःशासन द्रौपदीच्या साडीस हात घालतो, तिथपासून हे कथानक  एक वेगळे वळण घेते. इथे मराठी कवी मुख्य कथानक जरा बाजूला ठेवून, कृष्णाने द्रौपदीस पुरवलेल्या साड्यांचे वर्णन करू लागतात.… Continue reading चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

झुकझुक आगीनगाडी  : १७

रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असावा आणि रेल्वेतील आंतरविभागीय कारभार  सुरळीत चालावा  याकरता प्रत्येक  विभागाची  एक संहिता असते आणि वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा होत असतात. ह्या लहान मोठ्या  सुधारणांची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य कालमर्यादेत  होते की नाही याकरता अतिउच्चस्तरीय बैठका होतात  आणि त्या सुधारणांची अंमलबजावणी झाली की नाही  याची त्या  ठिकाणी तपासणी केली जाते. अशा अतिउच्चस्तरीय … Continue reading झुकझुक आगीनगाडी  : १७

 स्वागत : आकाशवाणी पुस्तकरूपात

१ आकाशवाणीचं हे … शतकपूर्तीच्या वळणवाटा, आता पुस्तकरूपात ! भारतीय जनमानसाच्या मनमानांत रुजलेली आणि भारतीयत्वाची निजखूण म्हणून सांगता येईल अशी आकाशवाणी १०० वर्षांची झाली.  त्या निमित्ताने आकाशवाणीच्या या रंजक वाटचालीचा आढावा घेणारे एक सदर व त्याचे अभिवाचन आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे निवृत्त केंद्र संचालक गोपाळ अवटी  यांनी केले वर्षभर सादर केले. ही मालिका सादर होत असतानाच… Continue reading  स्वागत : आकाशवाणी पुस्तकरूपात

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

Leave a Reply