जून २०२६

जून २०२६ : संपादकीय 

अग्रलेखांचा अस्त   नुकताच पुण्यातील एका  ख्यातनाम  दैनिकाने अग्रलेख थांबवण्याची रीतसर  घोषणा केली.  पूर्वी एखादे वृत्तपत्र वाचले जायचे ते त्यातील अग्रलेखासाठी.  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून अग्रलेख आणि ते नियतकालिक घेणारे संपादक यांचे एक अद्वैत होते.  स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रे चालवली जायची ती आपले विचार आपली धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची या हेतूने.  ती वृत्तपत्रे व… Continue reading जून २०२६ : संपादकीय 

काफ्काची लघुकथा – कायाबदल        

  शेक्सपिअरच्या किंग लियर या नाटकात एक मजेदार वाक्य आहे त्याचा आशय ‘वात्रट पोरे किड्यामुंग्यांना खेळ म्हणून मारतात, त्याच प्रमाणे हे देव त्यांचा खेळ म्हणून माणसांना मारतात. नियतीचा व्यवहार असा क्रूर आणि मनमानी असतो. नियती निष्ठुर असेलही;  पण माणूस उलट्या काळजाचा आणि दुसऱ्याला जिवंत सोलणारा असतो. समाजात हे आपण पाहत असतो. जेव्हा हे वास्तव ललितकलेच्या रूपात… Continue reading काफ्काची लघुकथा – कायाबदल        

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ५

वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर : जीवनमूल्यांना समर्पित साहित्यिक  ज्ञानपीठ पुरस्कारांच्या दशकपूर्ती वर्षात विष्णु सखाराम खांडेकर या मराठी साहित्यविश्वाच्या सुपुत्राला हा सन्मान मिळाला. तसे पाहता आदल्याच वर्षी हा पुरस्कार मिळवणारे द.रा.बेंद्रे हे मूळचे मराठी भाषकच;पण त्यांचे बहुतांश आणि महत्त्वाचे साहित्य कन्नड भाषेत होते. १९७४ मध्ये हा पुरस्कार प्राप्त करणारे खांडेकर हे तत्कालीन लेखकांमधील ज्येष्ठ होते, पण… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ५

प्रकाशन समारंभ वृत्तांत

“१५५ सदाशिव पेठ, सातारा”     “महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण होण्यामध्ये साताऱ्यातील दाभोलकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच दाभोळकर विचाराचा वेध घेतात, घटनांचा कार्यकारणभाव तपासतात आणि त्यातील संगती – विसंगती यांचे विश्लेषण व अन्वेषण करतात. दाभोळकर बंधू-भगिनींनी शिक्षणाच्या, शेतीच्या,  सामाजिक सुधारणांच्या व नवोन्मेषाच्या क्षेत्रामध्ये केलेले काम अतुलनीय  आहे,” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के… Continue reading प्रकाशन समारंभ वृत्तांत

पुनरपि जननं : प्रकरण सोळा

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण सोळा

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (१२) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (१२) 

मोरोपंत : भाग २

काव्यातील कलाकुसरीवर मोरोपंतांचा विशेष भर होता. वेगवेगळ्या प्रसंगांतून याची चुणूक दिसते.  श्रीरामाला पाहताच शूर्पणखा त्याच्या प्रेमात पडते. त्याला म्हणते, “माझ्याशी लग्न कर!”  हे साधेसुधे वाक्य मोरोपंतांनी कसे रंगवले आहे : २२/१९ रुचिराक्षी हेमंती, रघुनाथाला म्हणे, ‘मला वरणे’  आवरणे स्मरवैरी रक्षीं वीरा! भुजामलावरणें (शंकरासारख्या वैराग्याला आवर घाल आणि भुजांच्या आवरणाने मला वेढून घे, मला कवेत घे.) … Continue reading मोरोपंत : भाग २

नाडकर्णी सर नसताना…

     १५ मे. बातमी आली, डॉक्टर आनंद नाडकर्णी गेले. आम्ही सगळे कुटुंबीय तेव्हा भूतानला फिरायला गेलो होतो. त्या संध्याकाळी फोबजीका इथल्या हॉटेलवर पोचलो. नेट मिळालं आणि बातमी कळली. आम्ही सगळेच सुन्न झालो. खोलीच्या तावदानातून बाहेरची दरी दिसत होती. हळूहळू काळोख होत होता. आम्ही बसून होतो. अधूनमधून सगळ्यांच्याच डोळ्यांतून पाणी येत होतं. इतकं, घरातलं कोणीतरी गेल्यासारखं, आधार… Continue reading नाडकर्णी सर नसताना…

कविता : जून २०२६ 

काय विचित्र योगायोग आहे पहा, मासिकासाठी म्हणून  आठ दिवसाच्या कालावधीत तीन कविता प्राप्त झाल्या;  दोन  मराठी  ,एक इंग्रजी.  या तीन कवितांमध्ये एक दुवा होता, कर्करोगाचा!   कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काय काय होते.  रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व एकंदरीतच रुग्णाची परिसंस्था कशी ढवळून निघते त्याचे अनुभव सांगणारे या तीन कविता आहेत.   हल्ली वेगवेगळ्या कारणाने माणसाचे आयुर्मान वाढते आहे.… Continue reading कविता : जून २०२६ 

आंदोलन हस्तांचे व मनाचे 

एका स्नेहसंमेलनात मला एक ओळखीचा मुलगा भेटला.  “काय म्हणताय? किती दिवसांनी भेटतोय आपण!” असं म्हणत त्याने हात पुढे केला. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याच्या हाताची पकड अगदी सैल होती. तेवढ्यात माझा नवरा आला आणि त्या मुलाने त्याच्याशीही हस्तांदोलन केलं. या वेळी मात्र ती पकड अगदी घट्ट, आत्मविश्वासपूर्ण होती. तो फरक इतका स्पष्ट होता, की मला… Continue reading आंदोलन हस्तांचे व मनाचे 

चित्रओळी(२) :  चित्रमय पूजा : महाराष्ट्रातली पट परंपरा

भारतात विविध ठिकाणी उपासनेमध्ये चित्रांच्या पटांना महत्वाचे स्थान आहे. अनेक धर्म व पंथांच्या उपासनेमध्ये चित्रमय पट वापरले जाण्याची दीर्ध परंपरा आहे. मंदिरांमध्ये, घरांमध्ये, पूजा-व्रतांमध्ये व सणांच्या सजावटीसाठी चित्रमय पटांचा वापर केला जात असे. मराठी समाजातही असा सौंदर्यवारसा होता. चैत्रगौरी पट, संक्रांति पट, पिठोरी पट असे विविध पट आपला चित्रकलेचा वारसा चालवित असत. चैत्र गौरीपट चैत्रगौरी… Continue reading चित्रओळी(२) :  चित्रमय पूजा : महाराष्ट्रातली पट परंपरा

झुकझुक आगीनगाडी : १६ 

रेल्वेमध्ये  आणि रेल्वे परिसरात प्रवाशांना जितक्या सोई दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सोई कोणत्याही  वाहतूक व्यवस्थेत दिल्या जात असतील असे मला तरी वाटत नाही. उदा. स्टेशनवरील फुकट Wi-Fi, सर्व प्रकारच्या उद्घोषणा, डिजिटल घड्याळे, प्रतीक्षागृह, स्नानगृहे, शौचालये, वेगवेगळी Apps, घरात बसून आरक्षण इ. अर्थात, प्रसंगी या सोई-सुविधांचा दर्जा  कमी जास्त होत असेलही.  मुंबईमध्ये मी रेल्वे  आणि  रेल्वे… Continue reading झुकझुक आगीनगाडी : १६ 

नावात काय आहे? 

एकदा दुपारच्या उन्हात, भर तीन वाजता माझी आत्तेबहीण वाण्याच्या दुकानात गेली. तिने चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) घेतली. पैसे देत असताना तिला एक मैत्रीण भेटली.  ‘उन्हाची कुठे आलीस बिस्किटं घ्यायला?’ ‘अगं, आमच्या जोबीसाठी.’ ‘अय्या, तुम्ही कुत्रा कधी घेतला?’ —— चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) खाणारी, कुत्रा नाही ती – जोबी – म्हणजे मी.  नाव निवडताना माझ्या आईवडिलांनी जोडाक्षरांनी ठासून… Continue reading नावात काय आहे? 

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

Leave a Reply