मे २०२६

संपादकीय : मे २०२६  : चित्रामागचे व्यंग 

   काही व्यंगचित्रे बघता क्षणी समजतात तर काही समजण्यासाठी आपल्याला थोडे प्रयास करावे लागतात. त्या चित्रात दाखवलेल्या गोष्टी आणि मजकूर यांचे संदर्भ तपासावे लागतात, समजून घ्यावे लागतात. नुकतेच न्यू यॉर्कर  या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे व्यंगचित्र दुसऱ्या प्रकारचे आहे.  सर्वप्रथम MOMA म्हणजे काय ते समजून घ्यावे लागते.MOMA म्हणजे न्यू यॉर्क या शहरातील सुप्रसिद्ध  म्युझियम ऑफ मॉडर्न… Continue reading संपादकीय : मे २०२६  : चित्रामागचे व्यंग 

आगामी : पुस्तक प्रकाशन समारंभ 

१५५ सदाशिव पेठ, सातारा. लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा (संपादक : भानू काळे व अनिल जोशी) प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे सहर्ष निमंत्रण, मूळच्या असलेल्या दाभोलकर कुटुंबाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या  ‘१५५ सदाशिव पेठ, सातारा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या  प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. • वेळ आणि स्थळ • सातारा परिसरातील ज्या… Continue reading आगामी : पुस्तक प्रकाशन समारंभ 

अधिक महिना 

अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. चालू वर्षी – शके १९४८  (इ.स.२०२६ ) –  हा मान ज्येष्ठ महिन्याला मिळाला आहे. रविवार १७ मे ते सोमवार १५ जून  २०२६ हा कालावधी अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जाईल. दरवर्षी येणाऱ्या – म्हणजे निज ज्येष्ठ महिन्याचा कालावधी मंगळवार १६ जून ते  १४ जुलै… Continue reading अधिक महिना 

महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले यांची आठवण

🎼🎵🎼🎷🎼🎺🎼🎸🎼🪕🎺🎹🎸🎻               मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. चोहोबाजूंनी प्रचंड विस्तारलेले शहर, प्रचंड मोठी धावपळ, गजबज आणि सतत  धावायला लावणारे शहर आहे. या शहरात कितीतरी प्रकारची नानाविध क्षेत्रांतील, वेगवेगळ्या स्वभावांची,  जातीधर्मांची, सर्व पंथांची जगातील व राज्यांतील सर्व भागांतून असंख्य माणसे त्यांची रंगीबेरंगी स्वप्ने, ध्यास घेऊन पूर्ण करण्यासाठी सतत येत असतात. काहीजण नेटाने, अथक प्रयत्नाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात… Continue reading महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले यांची आठवण

पुनरपि जननं ,भाग १५ : पृथ्वीवर पदार्पण

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं ,भाग १५ : पृथ्वीवर पदार्पण

महाकवी मोरोपंत : (१)

संस्कृत विद्वान मोरोपंतांचे लेखन हा न संपणारा वाचनाभ्यास आहे. जन्म शके १६५१ ते मृत्यू शके १७१६ या अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील १५ वर्षे बाल्य आणि शिक्षणाची धरली तरी ५० वर्षं  निरंतर लेखनध्यास घेतलेला हा विलक्षण कवी. त्यांची काव्यसंपदा सूचीच थक्क करणारी आहे.  १)भारत १८ पर्वे २)भागवत दशम स्कंध आणि काही आख्याने ३)१०८रामायणे वेगवेगळ्या वृत्तांतली आणि… Continue reading महाकवी मोरोपंत : (१)

 ज्ञानपीठ पुरस्कार लेख ४ : 

  ‘द.रा. बेंद्रे : एक द्विभाषिक साहित्यिक’    या पुरस्काराच्या निमित्ताने अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. डॉ. बेंद्रे हे मूळचे मराठी भाषिक असूनही त्यांचे बहुतांश लेखन कानडी भाषेत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकांची शेजारी राज्ये असल्याने सीमावर्ती भागांमध्ये अनेक जणांना दोन्ही भाषा येतात. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आठ कानडी लेखकांकडे नजर टाकली तर बेंद्रे यांच्याशिवाय आणखी पाचांचा मराठीशी… Continue reading  ज्ञानपीठ पुरस्कार लेख ४ : 

आर्किटेक्चरचा वेगळा प्रवास : प्रॉडक्शन डिझाइन आणि थीम्ड एंटरटेनमेंट

लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड, जागा आणि रचना याबद्दलची उत्सुकता यामुळे मी आर्किटेक्चर हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले आणि भारतात आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली. आर्किटेक्चर शिकताना केवळ इमारती कशा उभ्या राहतात हेच शिकवले जात नाही, तर माणूस आणि स्पेस यांच्यातील नातं समजून घ्यायला शिकवलं जातं. एखादी जागा माणसाला कशी वाटते, तो त्या जागेत कसा वावरतो, त्या जागेचा… Continue reading आर्किटेक्चरचा वेगळा प्रवास : प्रॉडक्शन डिझाइन आणि थीम्ड एंटरटेनमेंट

कविता : मे २०२६ 

कहाणी… राजकारणातल्या कलेची आणि कलेतल्या राजकारणाची… (ज्येष्ठ कविवर्यांची क्षमा मागून) तेच किस्से त्याच कहाण्या तेच हशे आणि त्याच टाळ्या तीच वाक्ये – तीच गाणी सृजनाची झाली फक्त कहाणी/    ती (च) घराणी ती (च) परंपरा अहो, मी (च) आहे त्यातील मोठा बडा घर पोकळ वासा मात्र सांगेन मीच नेता/   घागर भरली रिती झाली पुन्हा भरली… Continue reading कविता : मे २०२६ 

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (११) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (११) 

चित्रओळी (१) : श्रीगणेशा

‘वस्त्रगाथाकार’ विनय नारकर यांच्या व्यासंगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते करत असलेला मराठा चित्रशैलीचा अभ्यास. याबाबत ते अंतर्नादमध्ये क्रमशः लिहिणार आहेत.या लेखमालेतील निवडक चित्रे ही अंतर्नादच्या काही आगामी अंकांची मुखपृष्ठे असतील. संपादक ‘वस्त्रगाथा’ हे पुस्तक २०२४ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्राची वस्त्र परंपरा आणि माझा संशोधन-प्रवास या विषयावरचे हे पुस्तक आहे. वस्त्रगाथाच्या रचना प्रक्रियेत सगळ्यात जास्त… Continue reading चित्रओळी (१) : श्रीगणेशा

झुकझुक आगीनगाडी(१५) :  पुनश्च सोलापूर

कोकण रेल्वेत सुरुवातीपासूनच OFC तंत्र होते. मी तिथे उपकरण बदलणे, OFC Cable आणि उपकरणांतील  त्रुटी काढणे आणि पूर्ण कोकण रेल्वे भारतीय रेल्वेच्या दळणवळण नकाशावर (NMS) आणणे एवढेच, पण ३ ते ४ महिने चालणारे क्लिष्ट आणि जिकीरीचे  काम करत होतो; कारण  हे सर्व काम मला तेथील चालू असलेली सिग्नल आणि दूरसंचार प्रणाली  बंद न करता करायचे… Continue reading झुकझुक आगीनगाडी(१५) :  पुनश्च सोलापूर

   अडुळसा : महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती 

  अडुळसा ही आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. अडुळशाचं रोपटं तीन  साडेतीन  फुटांचं असतं. हे  रोपटं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात  पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरून येतं. पानं लांबट, निमुळत्या आकाराची. पानांचा रंग हिरव्यापेक्षा पोपटी रंगाकडे झुकणारा. पानं  अगदी जमिनीलगतच्या  खोडापासून ते अगदी वरपर्यंत दिसतात. त्यामुळे पानांनी बहरलेल्या रोपट्याचा  आकार दुरून साधारण  त्रिकोणी  वाटतो. वर्षभरात या रोपट्याकडे फार लक्ष… Continue reading    अडुळसा : महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती 

पुस्तक परिचय : रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांचे चरित्र

  गेल्या महिन्यात आमचे मित्र व जयहिंद प्रकाशनाचे हेमंत रायकर यांचा फोन आला. ते म्हणाले, “गोव्याचे श्री.परेश प्रभू हे रंगसम्राट मुळगांवकर यांचे चरित्र लिहीत आहेत. गेली चार वर्षे ते त्याच्यावर काम करीत आहेत. आपण मुळगांवकरांचे एक भक्त व व्यासंगी असल्यामुळे मी आपला नंबर त्यांना दिला आहे.”  त्यापाठोपाठ दहा मिनिटांतच श्री.प्रभूंचा मला फोन आला. सध्या मी… Continue reading पुस्तक परिचय : रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांचे चरित्र

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

 मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

Leave a Reply