मुखपृष्ठ: एप्रिल २०२६ : चैत्रांगण
रांगोळी : सौ. शुभांगी जोशी चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते. चैत्रांगणाचा उगम हा लोकसंस्कृतीत आहे. विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत एकूण किती चिन्हे… Continue reading मुखपृष्ठ: एप्रिल २०२६ : चैत्रांगण
अग्रलेख : सन्मानाने निरोप घेण्याचा हक्क – एक काळाची गरज
भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काही खटले असे आहेत, की त्यांत केवळ कायद्याची व्याख्या होत नाही; तर मानवी संवेदना आणि मानवी आयुष्याच्या सन्मानाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न होतो. हरीश राणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल याच श्रेणीतील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावरून (Life Support) हटवण्याची परवानगी देऊन न्यायालयाने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे, की ज्याप्रमाणे… Continue reading अग्रलेख : सन्मानाने निरोप घेण्याचा हक्क – एक काळाची गरज
ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ‘तेलगू कविसम्राट’ विश्वनाथ सत्यनारायण १९६५ साठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी.शंकर कुरूप यांच्यानंतर आज आपण थेट १९७०चे मानकरी विश्वनाथ सत्यनारायण यांचा परिचय करून घेणार आहोत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या लेखमालेत चौदा भाषांचे प्रतिनिधित्व असणार आहे. अर्थात एखाद्या भाषेच्या लेखकाबद्दल लिहिताना त्या भाषेतील इतर पुरस्कारप्राप्त लेखकांची थोडक्यात का होई ना, ओळख होईलच. पोत्तु श्रीरामुलू यांच्या आमरण उपोषणामुळे… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३
धर्म नावाची मजेशीर गोष्ट
समाज कुटुंबाचा बनलेला असतो. ही कुटुंबे वेगवेगळे धर्म बाळगून असतात. कुटुंबात जन्म झाला, की आपण त्या कुटुंबाच्या धर्माचे बनून जातो. कुटुंब हिंदू असेल तर आपण आपसूक हिंदू म्हणून ओळखले जातो. एवढ्यावर संपत नाही. ज्या धर्मात जन्म झालाय त्या धर्माचा अभिमान बाळगण्याची पद्धत असते. त्या पद्धतीनुसार आपण जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा अभिमान बाळगायला लागतो. एकप्रकारची सक्तीच असते ती. कोणी विचारत नाही,… Continue reading धर्म नावाची मजेशीर गोष्ट
काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद
मागची रांग मध्यभागी डॉ रॉबर्ट क्लॉपस्टॉक,पुढची रांग उजवीकडून दुसरे काफ्का पत्रलेखन हे जिवंत असते. कार्ड, पिक्चर पोस्टकार्ड, कागदावर शाईत, पेन्सिलीने लिहिलेली पत्रे, टाईप केलेली पत्रे या सगळ्यांना एक काया असते. या कायेची किमया इ-मेल मध्ये नाही. पाश्चात्त्यांना – अगदी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांतील पाश्चात्त्यांना – त्यांच्या आजी-आजोबांची, मित्रांची, नातेवाइकांची पत्रे जपून, पुढच्या पिढीला देण्याचे वेड असते. लेखक, विचारवंत, विज्ञानवंत,… Continue reading काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद
हृदयाची फाळणी : भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजी
भारताच्या फाळणीचा इतिहास हा केवळ भूगोलाच्या नकाशावर ओढलेल्या रेषांचा इतिहास नाही; तर तो मानवी संवेदना, विश्वास आणि स्वप्नांच्या बघता- बघता झालेल्या धुळधाणीचा इतिहास आहे. महात्मा गांधींच्या सहवासात वाढलेले आणि गांधीविचारांचे थोर भाष्यकार नारायणभाई देसाई यांनी लिहिलेल्या ‘जिगरना चिरा’ या मूळ गुजराती पुस्तकाचा ‘हृदयाची फाळणी’ या नावाने डॉ. विश्वास पाटील यांनी केलेला मराठी अनुवाद, फाळणीच्या जखमांकडे पाहण्याचा एक नवा आणि… Continue reading हृदयाची फाळणी : भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजी
कल हो ना हो…
बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे… ४७ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणाच्या तीव्र इच्छेतून एकत्र आलेली आपापल्या शाळांतील हुशार मुलंमुली. एकमेकांसाठी जवळजवळ सगळेच अनोळखी … कुणी डॉक्टरांचे, कुणी सरकारी सायबांचे, काही शिक्षकांचे, काही बागायतदारांचे – पण बरेच जण सरकारी-निमसरकारी कामगारांच्या middle class बिऱ्हाडांतले…धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुण्यासह या जिल्ह्यांतील छोटी-मोठी गावं अन् अतिदुर्गम वाडी वस्तीवरील, गरीब, श्रीमंत, सवर्ण,अवर्ण, गौरवर्णी, कृष्णवर्णीय २०० विद्यार्थी… देहबोलीतून डोकावणारा लाजरेपणा,… Continue reading कल हो ना हो…
जपानवारी (पूर्वार्ध)
आम्ही चौघेजण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शारदशोभा (Autumn Colours🍁) बघायला आणि हिमवर्षा अनुभवायला म्हणून जपानला गेलो. चौघे म्हणजे मी, माझी ‘ही,’ माझा मित्र संकेत आणि त्याची ‘ही’. माझी ताई (चुलत बहीण) कामानिमित्त गेली ३ वर्षे टोकियोमध्ये असते. तिच्याकडे जाणे, आमच्या भाचराला (वय वर्ष ६) भेटणे असाही या वारीचा भाग होता. नियोजनाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली होती. म्हणजे विमानाचं तिकीट काढून… Continue reading जपानवारी (पूर्वार्ध)
पुनरपि जननं : भाग चौदावा
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून… Continue reading पुनरपि जननं : भाग चौदावा
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (१०)
आकाशवाणीचं हे …. ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (१०)
झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१४
——————————————————————————————– श्री. जॉर्ज मैथ्यू फर्नांडीस (३जून १९३० – २९ जानेवारी २०१९ ) कोकणकिनारी मंगलोर येथे जन्म झालेले समाजवादी नेते. मंगलोर येथील वाहतूकक्षेत्रात कामगार नेते होते, तेव्हापासून, ‘मुंबईला रेल्वेने कसे जाता येईल?’ हाच विचार त्यांच्या मनात घोळत असे. रेल्वेमंत्री असताना त्यांची नजर ३० जून १९९० रोजी सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या ई. श्रीधरन (अभियांत्रिकी सदस्य, रेल्वे बोर्ड ) यांच्याकडे गेली आणि त्यांनी… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१४
चित्रकथा : कच्छ पुनश्च
माझी कच्छला जाण्याची ही तिसरी वेळ. ‘कच्छ देखा, मगर बहोत कुछ नहीं देखा.’ असा अनुभव आला. सुरुवात झाली ती एका स्वप्नाने. ३४ कि.मी.चा एकेरी, अरुंद, सरळ, समांतर, एकही वळण नसणारा, खाचखळगे नसलेला ‘Road to the Heaven.’ ह्या रस्त्यावर मनसोक्त फिरायचे – हात लांब केले तर जणू हाताला अथांग मीठसागर लागेल! त्या मीठसागरात उगवता, मावळता सूर्य बघायचा. रात्री चंद्राच्या शीतलतेत चमचमणारे… Continue reading चित्रकथा : कच्छ पुनश्च
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी
