मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२५
या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत मनस्विनी लाटकर. आपल्या चित्राविषयी त्या म्हणताहेत : मी मनस्विनी लाटकर. या वेळी मी दिवाळी या सणातील आनंद, उत्साह, घर नीटनेटके व स्वच्छ ठेवण्याबाबतची उत्सुकता आणि घरी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना रमलेले एक भारतीय कुटुंब अशी संकल्पना घेतली आहे. या चित्रातील आणखी एक कल्पना अशी आहे,… Continue reading मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२५
संपादकीय : ऑक्टोबर २०२५
साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडप्रक्रिया फेरविचार आवश्यक : मराठी साहित्य संमेलन हे एक प्रकारे मराठी मनाचे प्रतिबिंब आहे. ते जितके समृद्ध, समावेशक आणि लोकशाही पद्धतीचे असेल तितके मराठी साहित्य आणि मराठी समाजाचे भले होईल. या वार्षिक साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड पूर्वी मतदानाने व्हायची. निवडणुका नको म्हणून अनेक मान्यवर साहित्यिक या अध्यक्षपदापासून… Continue reading संपादकीय : ऑक्टोबर २०२५
सर्जनसोहळा
“अर्थहीन असतं भाषेचं हत्यार… मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे थांबतात मौनाच्या उंबरठ्याशी येऊन हिरमुसल्या पाण्यासारखे पुन्हा आत परततात चार-दोन औपचारिक शब्दांचा आसरा घेऊन अडखळत बाहेर पडतात, तिथे अडतात, विरतात” शांताबाईंचे शब्द आधाराला घेऊन मनाची उत्कटता मांडू बघते आहे. “आसमन्ताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत रुजतात कोवळे हिरवे प्राण अशाश्वत मातीत… Continue reading सर्जनसोहळा
मुलाखत : डॉ.अनंत देशमुख
मुलाखत: डॉ. अनंत देशमुख मुलाखतकार: प्रा. प्रतिभा सराफ परिचय – डॉ. अनंत देशमुख निवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई. संशोधक, समीक्षक आणि चरित्रकार. एम. फिल. आणि १० पीएच. डी.च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन. साहित्य आणि समीक्षेतील योगदानासाठी ‘कोकण साहित्य भूषण’ हा कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) … Continue reading मुलाखत : डॉ.अनंत देशमुख
स्मृती ललितकृतीच्या स्मृती चित्रपटांच्या
माझा एक न्युरॉलॉजीस्ट मित्र गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ. त्याच्याशी गप्पा छाटताना आनंद देणार्या नवीन गोष्टी कळतात. त्याला पंडित लोक ज्ञान वगैरे म्हणतात. तो सांगत होता, “तुला आठवतं आपण एकदा कोकणात सहलीला गेलो होतो. आपल्याबरोबर एक दोस्त होता, तो दूरदर्शनवर बातम्या सांगायचा. तो निवृत्त होऊन बरीच वर्षं झाली होती. गावात त्याला कोणीतरी… Continue reading स्मृती ललितकृतीच्या स्मृती चित्रपटांच्या
रघुवंशातील राजेशाही
मानवाच्या इतिहासातली पहिली राज्यव्यवस्था बहुधा राजेशाही ही असावी. विविध कुले (clans) आपले शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी सर्वांत शक्तिशाली माणसाला नायक म्हणून निवडत असतील. त्या बदल्यात ती त्याला मान व खंडणीसारखे धन देत असावीत. हा नायकच पुढे राजा होत गेला असेल, असा तर्क करता येतो. भारतवर्षात तर ‘ना विष्णुः पृथिवीपतिः’ असे म्हणून… Continue reading रघुवंशातील राजेशाही
मराठी माणसा तू कुठे आहेस ?
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी दुपारच्या गाडीने मुंबईला चाललो होतो. एका स्टेशनावरती एक भय्या आकाराने खूप मोठे पण वजनाला हलके असे बोचके घेऊन डब्यात चढला. गाडीत विशेष गर्दी नव्हती. बोचके डब्याच्या पॅसेजमध्ये ठेवून तो माझ्या बाजूच्या सीटवरती बसला. माझे कुतूहल जागे झाले. मी त्या भय्याला विचारले, “इस में क्या… Continue reading मराठी माणसा तू कुठे आहेस ?
मन वढाय वढाय भाग ८
स्किझोफ्रेनिया आणि लग्न मागील दोन लेखांमधून आपण स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची, त्यावरील उपचारांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे नियमित उपचार घेणारे रुग्ण आणि काही कारणांनी उपचार अर्धवट घेतलेले रुग्ण यांचे अनुभव बघितले. या लेखामध्ये मी स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांना आणि त्यांच्या घरच्यांना सतावणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर थोडक्यात लिहिणार आहे. स्किझोफ्रेनिया… Continue reading मन वढाय वढाय भाग ८
माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर
प्राध्यापक आरोसकर मला पहिल्यांदा भेटले ते साधारण १९७९-८० च्या सुमारास. तेव्हा माझ्या कविता मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्या होत्या – किर्लोस्कर, स्त्री, राजस, हंस आणि एखाद् दुसरी कविता सत्यकथेतदेखील! हंसमध्ये तेव्हा जवळ जवळ दर महिन्याला माझी एखादी कविता प्रसिद्ध होत होती. त्यांतली एक कविता आरोसकरांना आवडली आणि ते थेट आमच्या घरी… Continue reading माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर
कविता : ऑक्टोबर २०२५
पाखरांच्या कविता नजरेत संपूर्ण मावणारे मेघाच्छादित कुंद आकाश हिरव्यागार झालेल्या वनराईच्या अगणित पोपटी पानांना संथ गतीने अविरत भिडणाऱ्या रिमझिम जलधारा झाडाझाडांच्या पानांवर पंख पालवून पाणी झटकत संथ विसावणारे असंख्य पक्षी हळू-हळू एकत्र येऊन आपल्या चोचीने पानांच्या शिरांखाली बसतात लिहीत असह्य वेदनांमुळे मेघाश्रुंनी दाटून गेलेल्या आभाळाच्या डोळ्यावरील अगम्य कविता… जखम … Continue reading कविता : ऑक्टोबर २०२५
अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(४)
आकाशवाणीचं हे …. ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च। वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती… Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(४)
पुनरपि जननं : ८
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : ८
झुकझुक आगीनगाडी: ८
पंढरपूर – मिरजचे आता ब्रॉड गेजमध्ये रूपांतर होणार म्हणून काही दिवसांनी आम्ही सर्व खातेप्रमुख पंढरपूर-मिरज विभागात गेलो; कारण आता तो मार्ग मीटर – गेजच्या ऐवजी ब्रॉड गेजमध्ये (सोप्या भाषेत मार्गाचे विस्तारण होणार) रूपांतरित होणार होता. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या विभागाची उपकरणे, यंत्रे काढणार होतो. ती आमची मीटर गेजवरील… Continue reading झुकझुक आगीनगाडी: ८
स्मरणरंजन
मौजेची रंगीत दिवाळी जातीभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाज सुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यामध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद उर्फ अनंत हरी गद्रे. ऑक्टोबर १८९० मध्ये जन्म व १९६७ मध्ये मृत्यू असा त्यांचा… Continue reading स्मरणरंजन
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे
