
या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत मनस्विनी लाटकर. आपल्या चित्राविषयी त्या म्हणताहेत :
मी मनस्विनी लाटकर. या वेळी मी दिवाळी या सणातील आनंद, उत्साह, घर नीटनेटके व स्वच्छ ठेवण्याबाबतची उत्सुकता आणि घरी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना रमलेले एक भारतीय कुटुंब अशी संकल्पना घेतली आहे.
या चित्रातील आणखी एक कल्पना अशी आहे, की यात कोठेही फटाके उडवताना माणसे दाखवली गेली नाहीत. सारे कुटुंब एकत्रितपणे या सुंदर सणाची वाट पाहत आहे आणि कुटुंबातील प्राण्यालासुद्धा या सणाला सुरक्षित वाटत आहे.
चेहऱ्यावरील हावभाव आणि रंगसंगती हा या चित्राकडे पाहण्याचा, चित्र समजण्याचा मार्ग आहे, असे मी समजते. उदाहरणार्थ : गर्द निळ्या संध्याकाळी घरातील पिवळ्या उजेडाचा विरोधाभास.
