मुखपृष्ठाविषयी : मे २०२५
या वेळचे मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत राजेंद्र भोसले. बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जाऊन गावातील शेतात एक टुमदार घर बांधले आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात शेतातून फेरफटका मारून होते. त्या वेळी त्यांना दिसणारे निसर्गाचे विविध विभ्रम आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा त्यांचा छंद आहे. हे छायाचित्र आहे हनुमान जयंतीच्या सकाळचे. झाडाला… Continue reading मुखपृष्ठाविषयी : मे २०२५
संपादकीय : मे २०२५
पुण्यातल्या दुर्दैवी वैद्यकीय घटनेच्या निमित्ताने… एक अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्याजवळ उपचारासाठी अजिबात पैसे नाहीत. पुढे काय? येथे रुग्णालय म्हटले की त्याचे महत्त्वाचे दोन प्रकार : शासकीय व खासगी. शासकीय रुग्णालयाबाबत पैशांचा काहीच प्रश्न येत नाही कारण तेथे केले जाणारे सर्व उपचार हे मोफत असतात. या दोन्ही प्रकारच्या… Continue reading संपादकीय : मे २०२५
एक संध्याकाळ : चेन्नईतील महाराष्ट्र मंडळात
तमिळनाडूमधील प्रवासाबद्दल बरेच लिहून झाले पण एक घटना मात्र लिहायची राहूनच गेली होती. इ-अंतर्नादच्या या मे महिन्याच्या अंकासाठी ती लिहावी असे वाटले. सुदैवाने संपादक अनिल जोशी यांनादेखील ती कल्पना आवडली. एका शनिवारी संध्याकाळी चेन्नई येथील प्रसिद्ध महाराष्ट्र मंडळात माझी मुलाखत ठेवलेली होती. ‘बदलता भारत’ हा विषय होता. अनिल जोशी स्वतःच… Continue reading एक संध्याकाळ : चेन्नईतील महाराष्ट्र मंडळात
प्रश्नोपनिषद : मे २०२५
मंडळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. चार्वाक दर्शनाचे एक ख्यातनाम भाष्यकार सदाशिव आठवले यांनी त्यांच्या ‘चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान’ या छोटेखानी पुस्तकात उपस्थित केलेला प्रश्न या वेळी तुम्हां सर्वांसमोर ठेवत आहे. इतिहास आणि वैचारिक इतिहास यावर चिंतन करताना हा… Continue reading प्रश्नोपनिषद : मे २०२५
संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३
नळराजाचं कौतुक करताना रघुनाथ पंडितांना विलक्षण काव्यस्फूर्ती येते. पुन्हा पुन्हा नळाची स्तुती करताना रघुनाथ पंडित विविध दृष्टान्त, उपमादी अलंकार गुंफत राहतात. या अलंकारांचं आणि स्तुतीचं निधान एकच असलं, अलंकारही पुनः पुन्हा तेच वापरले असले तरी कल्पनाचातुर्यामुळे ते रंजक ठरतात – कसे ते पाहू या! प्रतीप अलंकार ज्याची उपमा द्यायची त्याचंच… Continue reading संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३
मन वढाय वढाय: भाग ५ वा
आत्महत्या रोखू या, मिळून सारे प्रयत्न करू या! आत्महत्या म्हणजे स्वतःची हत्या! या विषयावर लिहिताना नेहमीच भावनिक व्हायला होतं. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता रोबिन्स विल्यम्सने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले ही बातमी ऐकली तेव्हाही असेच वाटले होते. प्रचंड यशस्वी, अतिश्रीमंत, अभिनयाची दैवी देणगी मिळालेला अभिनेता ज्याने त्याच्या अनेक चित्रपटांमधून आनंदी… Continue reading मन वढाय वढाय: भाग ५ वा
कविता : मे २०२५
सोहळा… छायाचित्र : वंदना बाजीकर. प्रत्येक माणूस जगत असतो आयुष्याचा अद्वितीय सोहळा तरीही असतो प्रत्येकाचा जगण्याचा ताल वेगळा वेगळा सापडत नाहीत कोणा कोणाला अचूक उत्तरे जगण्याची म्हणून काही संपत नाही लढाई त्यांच्या अस्तित्वाची ओघळून जातात पानावरून थेंब इतक्या सहज रितं झालं पाहिजे प्राजक्तासारखं न तुटता हलक्याने मन सुटलं पाहिजे ध्यास… Continue reading कविता : मे २०२५
झुकझुक आगीनगाडी : ३
प्रशिक्षणादरम्यान माणसे व यंत्रे यांचे खूप वेगवेगळे अनुभव आले. हे अनुभव दैनंदिन जीवनातसुद्धा खूप उपयुक्त ठरले. Classroom आणि Field चे सर्व ट्रेनिंग झाल्यावर आमची वर्यताक्रम ठरविण्यासाठी साठी नाममात्र परीक्षा झाली. माझ्या दुर्दैवाने त्या वेळी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर,भुसावळ आणि सोलापूर या ठिकाणी माझ्या पदाची रिक्त जागाच नव्हती. त्यामुळे मला जबलपूर मंडलमधील… Continue reading झुकझुक आगीनगाडी : ३
गुलामगिरीत वसाहतवादाची मुळे
‘गुलाम काळा संताघरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम’ —– आकाशवाणीतून ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील धून कानावर पाडली आणि मी तंद्रीतून दचकून जागा झालो. संतांनी तर सांगून ठेवले आहे वरलिया रंगा भुलू नकोस वगैरे; पण मी दचकण्याचे कारण निराळेच होते. वसाहतवादावरचे काही शोधनिबंध वाचत होतो. त्यात नमूद केले होते की… Continue reading गुलामगिरीत वसाहतवादाची मुळे
एका अद्भुत जगात
राहुलला गेल्या काही वर्षांत लागलेल्या छंदामुळे नेटवरून तो पक्षिनिरीक्षणासाठी नवनवीन जागांच्या शोधात असतो. त्यात त्याला नंदू तांबेच्या पक्षी अभयारण्याचा शोध लागला होता. त्याचे डिटेल्स वाचून तो अगदी प्रभावित झाला होता; परंतु जुलैमध्ये जर्मनीला जायच्या आधीपासून इच्छा असलेली नंदू तांबेकडची भेट शेवटी जानेवारीत सफल झाली. फोनवरून तो जरा अधिक शिस्तबद्ध माणूस… Continue reading एका अद्भुत जगात
महुद ते ह्यूस्टन : लेख ४
मुंबई ते ह्यूस्टन प्रवास (२७ ते २९ ऑगस्ट १९८१) २७ ऑगस्ट १९८१ला माझ्या घरचे व मित्रमंडळी मिळून जवळ जवळ ४० लोक मला सेंडऑफ द्यायला मुंबई विमानतळावर आले होते. ४४ वर्षांपूर्वी परदेशात जाणं हे आजच्या इतकं कॉमन नव्हतं. तो माझ्या आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास होता. प्रयाणापूर्वीच्या दोन आठवड्यांतील खरेदी आणि तयारीच्या प्रचंड… Continue reading महुद ते ह्यूस्टन : लेख ४
पुनरपि जननं : प्रकरण तिसरे
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या अवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननं : प्रकरण तिसरे
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी, स्नेहल आपटे
