मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
चार्वाक दर्शनाचे एक ख्यातनाम भाष्यकार सदाशिव आठवले यांनी त्यांच्या
‘चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान’ या छोटेखानी पुस्तकात उपस्थित केलेला प्रश्न या वेळी तुम्हां सर्वांसमोर ठेवत आहे. इतिहास आणि वैचारिक इतिहास यावर चिंतन करताना हा प्रश्न आला आहे.
कोणतीही नवी कल्पना ही परिस्थितीची जननी की कन्या? हा तो प्रश्न.
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा
jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
