डॉमिनिक लापिएर : समाजातून साहित्य, साहित्यातून समाज ???

साहित्याच्या पलीकडे जाऊन समाजावर आपला ठसा उमटवणारा आणि भारताबद्दल विशेष जवळीक असलेला एक प्रतिभावान साहित्यिक फ्रांसमधील आपल्या घरी ४ डिसेम्बर २०२२ ला  वारला. १९३१ साली जन्मलेले डॉमिनिक लापिएर मृत्यूसमयी ९१ वर्षांचे होते. शेवटची दहा वर्षे ते कोमामध्ये होते. निमित्त झाले होते पाय घसरून पडल्याचे. ‘वेदनांपासून त्यांना आता मुक्ती मिळाली आहे,’ या शब्दांत त्यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. योगायोगाने पत्नीचेही नाव डॉमिनिक हेच आहे. गेल्या … Continue reading डॉमिनिक लापिएर : समाजातून साहित्य, साहित्यातून समाज ???

मौज – सत्यकथेचा अस्त 

It is much easier to be critical than to be correct.  (अचूक असण्यापेक्षा टीका करणे खूप सोपे असते.) बेंजामिन डिझरेली, ब्रिटिश मुत्सद्दी (१८०४ – १८८१)  सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर या मान्यवर संपादकांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या ‘मौज–सत्यकथा बंद पडण्यामागील कारणांची मीमांसा’ या विषयाचा आवाका मोठा आहे आणि त्यामुळे लेखाची व्याप्तीही मोठी असणे अपरिहार्य आहे. सुरुवातीला ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ मासिक यांच्याविषयी काही लिहिणे आवश्यक आहे; … Continue reading मौज – सत्यकथेचा अस्त 

रामकृष्ण नायक : निरलस समाजसेवेचा नंदादीप 

 रामकृष्ण केशव नायक यांचे पाच-सहा दिवसांपूर्वी, म्हणजे २८ जानेवारी रोजी मडगाव येथे वयाच्या ९४व्या वर्षी झालेले निधन खूप चटका लावून गेले. वयाचा विचार केला तर ते अगदी अकाली म्हणता येणार नाही; पण तरीही त्यांच्या निधनाने अंतःकरणात खोलवर कुठेतरी एक कळ उमटली. साधारण वर्षापूर्वी दत्तप्रसाद दाभोळकर, अनिल व  शुभांगी जोशी, तसेच वर्षा व मी अशा पाच जणांनी गोव्यात थोडी भटकंती केली होती. गोव्यातील एक लेखक आणि … Continue reading रामकृष्ण नायक : निरलस समाजसेवेचा नंदादीप 

‘मला उमगलेला भारत’ या पुस्तकाची भूमिका

बदलता भारत हे भानू काळे यांचे गाजलेले पुस्तक बऱ्याच भ्रमंतीनंतर सिद्ध झाले होते.  अनेक व्यक्ती, संस्था व शहरे यांना भेट दिल्यानंतर जागतिकीकरण व त्याचे भारतावर झालेले  सकारात्मक परिणाम आपण वाचले होते.  (या गोष्टीला  जवळपास वीस वर्षे होत आली.  वीस वर्षांत भारत काही बदलला आहे का याचा पुन्हा एकदा शोध घेण्याची इच्छा बाळगून भानू काळे पुन्हा एकदा भारतातील काही निवडक ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या निरीक्षणांसह पुस्तक … Continue reading ‘मला उमगलेला भारत’ या पुस्तकाची भूमिका

आपला तुटत चाललेला समाज

 ज्येष्ठ पत्रकार आणि माझे एक स्नेही एकनाथ बागूल यांचे एकुलते एक चिरंजीव अनिरुद्ध यांचा मृतदेह पुण्याच्या पत्रकारनगरमधील त्यांचा  घरात सापडल्याची  बातमी मध्यंतरी ‘सकाळ’मध्ये  वाचली आणि खूपच धक्का बसला.  अनिरुद्ध यांचा आणि माझा काहीच पूर्वपरिचय नव्हता आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी मला माहिती नाही; पण सकाळमधील बातमीनुसार ते जाहिरात आणि चित्रपटक्षेत्रासाठी छायाचित्रण करत आणि त्यांचे वय फक्त ५१ होते. वडील एकनाथराव ऐंशीच्या घरात असून पत्नीच्या निधनानंतर सध्या … Continue reading आपला तुटत चाललेला समाज

अभिवाचन – डिसेंबर २०२३

 ‘सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरुवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे संकलन कालांतराने एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले.     या पुस्तिकेतील काही … Continue reading अभिवाचन – डिसेंबर २०२३

अरबांच्या आद्य देशात  

मुंबई म्हणजे मूळ सात बेटांचा समूह आणि त्यांना वेढणारा समुद्र म्हणजे अरबी समुद्र. एक मुंबईकर या नात्याने साहजिकच अरबी हा शब्द चिरपरिचित. नरीमन पॉइंटवर फिरायला येणारे, पायघोळ झगा घातलेले अरबी प्रवासी लहानपणापासून पाहिले होते. पावसाळ्यात पाऊस बघायला ते मुंबईला येत! शेजारच्या मरीन ड्राइव्हवरील एखाद्या हॉटेलात मुक्काम करत कारण तेथील खोल्यांच्या खिडक्यांतून समोर धो धो कोसळणारा पाऊस आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा अधिकच छान दिसत. मी बघितलेली … Continue reading अरबांच्या आद्य देशात  

‘चले जाव’चा लढा : आजच्या संदर्भात

८ ऑगस्ट १९४२. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन चालू होते. या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यानंतर वल्लभभाई पटेल बोलले आणि त्यांच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचे ओजस्वी भाषण झाले. एव्हाना सूर्यास्त झाला होता. संतापाने थरथरत असलेले नेहरू म्हणाले,  “आज आम्ही सारे पाश तोडून अखेरच्या युद्धाला तयार झालो आहोत. या मुकाबल्यात यशस्वी झालो तर स्वतंत्र हिंदुस्तानच्या भूमीवरच उभे राहू; नाहीतर … Continue reading ‘चले जाव’चा लढा : आजच्या संदर्भात

अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ – नोव्हेंबर २०२३

‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे संकलन कालांतराने एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले.     या पुस्तिकेतील … Continue reading अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ – नोव्हेंबर २०२३

नागराजन विठ्ठल : प्रशासकीय सेवेचा एक आदर्श 

देशाच्या संदर्भात विचार करायला लागले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांपुढे सर्वोच्च पदावर असलेले राजकीय नेते उभे राहतात आणि त्यांचीच चर्चा माध्यमांतून अधिक होत असते. याचे कारण देशाची ध्येयधोरणे लोकांनी निवडून दिलेले राजकीय नेतेच ठरवत असतात; ती सत्ता आणि ते अधिकार त्यांच्याच हातात असतात. हे अर्थात खरे असले, आणि लोकशाहीत ते तसेच असणे आवश्यकही असले, तरी त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यतः भारतीय प्रशासकीय सेवेतील (‘आयएएस’मधील) साधारण … Continue reading नागराजन विठ्ठल : प्रशासकीय सेवेचा एक आदर्श