अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ 

मंडळी नमस्कार,     ‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे संकलन कालांतराने एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले.  … Continue reading अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ 

केशवराव कोठावळे : मराठी साहित्याचा वसंतऋतु 

Lives of great men all remind us, We can make our lives sublime, And, departing, leave behind us, Footprints on the sands of time. (श्रेष्ठ अमेरिकन कवी हेन्री वॅड्सवर्थ लॉन्गफेलो याच्या दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या अजरामर ओळी) मॅजेस्टिक शब्दाचा अर्थ आहे भव्य, दिव्य, नेत्रदीपक. ते विशेषण सामान्यतः एखाद्या खूप मोठया वास्तूला उद्देशून वापरले जाते. मुंबईच्या गिरगावमधील मॅजेस्टिक थेटरला ते तसे लागू पडणारे होते, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या … Continue reading केशवराव कोठावळे : मराठी साहित्याचा वसंतऋतु 

संपादकीय

   अंतर्नादची ही इंटरनेट आवृत्ती या अंकापासून सुरू होत आहे याचा आनंद खूप मोठा आहे. तिचे सारे श्रेय ज्यांनी या इंटरनेट आवृत्तीची सगळी जबाबदारी घेतली आहे त्या डॉक्टर अनिल जोशी यांनाच द्यायला हवे. मी हा लेख लिहीत आहे तो केवळ छापील ते इंटरनेट ह्या अंतर्नादच्या प्रवासाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी.     अंतर्नाद मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९९५ मध्ये निघाला आणि अंतर्नादचे मासिक स्वरूपातील प्रकाशन २०१७ सालच्या दिवाळी अंकापासून थांबले … Continue reading संपादकीय