मुखपृष्ठाविषयी : जीवनप्रपात आणि मृत्युदर्शक
गिधाड हा पक्षी तसा ‘सुंदर’ म्हणता येईल अशातला नाही. या पक्ष्याबद्दल एक प्रकारचे भय आणि चीड मानव समाजात आहे. जिथे गिधाड तिथे मृत्यू अशी एक समजूत आहे, ती तशी अवास्तव नाही; कारण गिधाड हा मृत्यूचा द्योतकच आहे. हा पक्षी मृत प्राण्यांच्या मांसावर जगतो आणि आपले हे अन्न शोधण्यात तो अतिशय प्रवीण आहे. तो शक्यतो प्राणी… Continue reading मुखपृष्ठाविषयी : जीवनप्रपात आणि मृत्युदर्शक
संपादकीय: अमेरिका २
कुंभकला अमेरिका म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी, नवकल्पना आणि कल्याणकारी भांडवलशाही अशी आपल्या सर्वांचीच एक समजूत होती; मात्र विद्यमान अमेरिकन नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय राजकारणात वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या आणि इराण-युद्ध यांमुळे या प्रतिमेला बरेच तडे गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे काहीतरी भले व्हावे आणि राष्ट्राराष्ट्रांतील परस्पर संबंध नियंत्रित व्हावेत, या दृष्टीने अनेक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाल्या. दुसऱ्या महायुद्धातील निर्विवाद… Continue reading संपादकीय: अमेरिका २
ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ९
कुर्रतुलऐन हैदर : उर्दू साहित्यविश्वातील तेजस्वी पर्व अमृता प्रीतम आणि महादेवी वर्मा यांच्यानंतर थोड्याच अंतराने उर्दू लेखिका कुर्रतुलऐन हैदर यांच्यावरील लेख पाहून ज्ञानपीठ पुरस्कार अनेक स्त्री-साहित्यिकांना मिळाला असल्याचा समज कदाचित होईल. वास्तवात तसे नाही. एकूण ६५ पुरस्कारप्राप्त लेखकांपैकी केवळ ८ च लेखिका आहेत. या लेखमालेत आपण त्यांपैकी ६ लेखिकांचा परिचय करून घेत आहोत. बंगाली भाषेच्या… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ९
काफ्काची ग्रेट वॉल ऑफ चायना
२०१८ साली अमेरिकेला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर रिचमंडला जायचे मनोमन नक्की केले होते. एप्रिल १८६५ मध्ये यूनियन सैन्याने कॉंफेडरसीची (अमेरिकतील दक्षिणेतील ११ राज्यांचा एक गट १८६० ते १८६१ मध्ये अमेरिकेतून फुटून अमेरीकन यादवी युद्ध लढण्यासाठी बाहेर पडला होता.) राजधानी रिचमंड ताब्यात घेतल्यानंतर अब्राहम लिंकन तेथे गेला होता म्हणून नव्हे; तर तेथे एडगर अॅलन पो (१८०९-१८४९)… Continue reading काफ्काची ग्रेट वॉल ऑफ चायना
सुर्वे मास्तरांचं श्रम विद्यापीठ
नारायण सुर्वे हे कष्टकरी कामगारांचे कवी. आईच्या दुधापासून दुरावलेले, पण काळजातली माया पांघरणाऱ्या काशीबाई आणि गंगाराम सुर्वे या गिरणी कामगारांच्या अंगाखांद्यांवर वाढलेले. ‘दारिद्र्यातच ज्यांची भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ त्यांचे प्रवक्ते. ‘पोराला एकांत मिळावा, म्हणून चरफडत फुटपाथवर स्वतःची पथारी पसरणाऱ्या आणि खाणारं तोंड वाढलं म्हणून ‘नारायणा, तिलाही काम बघ बाबा’ असे म्हणणाऱ्या बापाची … Continue reading सुर्वे मास्तरांचं श्रम विद्यापीठ
मोरोपंतांचे शब्द ‘मोह’ळ
श्रीरामकथा वाचकांच्या मनी बिंबावी यासाठी मोरोपंत वेगवेगळे प्रयोग करतात हे आपण पाहिलंच आहे. या प्रयोगांचा कधीकधी अतिरेक होतो आणि कथेतील रामाऐवजी शब्दांनाच महत्त्व दिले जाते. ‘श्रीरामचंद्रांची प्रार्थना’ या शीर्षकाखाली येणाऱ्या काव्यात प्रार्थनेच्या भावाऐवजी असा शब्दखेळ अधिक आहे. त्वदश्रयें खोटी परमाया सदा विती जीव भ्रमविती रामा! पर माया सदा विती (३०३/३) कां सुदासी नको? वळें कां… Continue reading मोरोपंतांचे शब्द ‘मोह’ळ
पुनरपि जननं : २०
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं : २०
खवय्या : गुऱ्हाळ (भाग २)
गुऱ्हाळ – भाग २ मागच्या भागात आपण वेळेचं गणित पाहिलं. काही जणांनी रासायनिक प्रक्रिया न करता गूळ का करू शकत नाही असंही विचारलं. या भागात आपण रसायने का वापरली जातात? त्यामुळे नक्की काय फायदा होतो? ही रसायने खरंच अतिशय घातक दर्जाची असतात का? इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करू. रसायने वापरण्यामागे एक मुख्य मुद्दा आहे, ग्राहकांची बदललेली… Continue reading खवय्या : गुऱ्हाळ (भाग २)
झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. २०
रेल्वेच्या प्रत्येक मंडलात (Division) वरिष्ठ, अतिवरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या दरतीन-चार वर्षांनी बदल्या होत असतात. कधी-कधी तेच पद उन्नत (Upgrade) करून पुढील पदाचा कालावधी त्याच ठिकाणी वाढवला जातो आणि हे सर्व नियमात बसवून केले जाते. बदली झाल्यावर मग प्रश्न येतो, त्या पदाला शोभेल अशा ऑफिसचा आणि ‘सरकारी’ निवासस्थानाचा! आणि मग ‘नूतनीकरण’ या गोंडस नावाखाली जुन्या-नव्या वस्तू… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. २०
ऑक्टोबर २०२६ कविता : लोभ पॅरिसचा
पॅरिसच्या चढउतारी मोहक रस्त्यांवर वरचेवर वावरणारी विद्वान चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि कवी मंडळी वाटतात बिचारी कायम गुरफटलेली पॅरिसच्या लोभात ! त्यांच्या अस्थिर मेंदूत सदैव अदला बदल करणाऱ्या इकडून तिकडे वक्राकार फिरणाऱ्या टिंबांच्या त्या विकर्ष रेषा भासतात पुसट… पण तरीही रेखीव! असू दे ना पॅरिस फक्त गोलाकार पृथ्वीचा एक अंश पण आपल्या कलेला… विद्वत्तेला मान्यता मिळण्याच्या … Continue reading ऑक्टोबर २०२६ कविता : लोभ पॅरिसचा
रसग्रहण : ‘अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त’
रसग्रहण : ‘अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त’ लेखक : भानू काळे भानू काळेंचं आत्मचरित्र आणि अंतर्नाद मासिकाचं आत्मवृत्त यांची सुरेख गुंफण मौज प्रकाशनाच्या ‘अंतर्नाद | एका मासिकाचा उदयास्त’ या पुस्तकात साधली गेली आहे. सुजाण, सुबुद्ध दर्जेदार लिखाणाची भूक अंतर्नादने गेली तीस वर्षे भागवली. यापलीकडे मुमुक्षू वाचकाला सुजाण आणि सुबुद्ध करण्याचा मोठा प्रयत्न अंतर्नादने केला. हा सर्व… Continue reading रसग्रहण : ‘अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त’
वृत्तांत
विज्ञान कथा मूलतः माणसांच्याच कथा असतात – सुबोध जावडेकर मराठीमधील निवडक विज्ञान कथांचे सुबोध जावडेकर यांनी केलेलं संपादन नुकतंच साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकाचा परिचय वाचकांना करून देण्यासाठी महाराष्ट्र सेवा संघ संचालित साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालयातर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार हे… Continue reading वृत्तांत
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी
