मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत  मेधा चोबे.  त्यांच्या  या सॉफ्ट ऑइल पेस्टल माध्यमातील  निसर्गचित्रात समोरील दृश्याची तंतोतंत नक्कल न करता, ते इंप्रेशनिझम शैलीत साकारलेले दिसते. चित्रातील प्रतिमांच्या बाह्यरेषा धूसर ठेवल्यामुळे चित्रात वेगळीच कलाजाणीव निर्माण झाली आहे. चित्रातील मानवी आकृती हा आकर्षणबिंदू मानून चित्रात पायर्‍या,  कठडा, लालसर फुलझाडांचा  ताटवा इत्यादींची मांडणी अशी केली आहे की त्या चित्रघटकांवरून पाहणाऱ्याची नजर आकर्षणबिंदूकडे जाते व चित्रावर खिळून राहते. डॉ. … Continue reading मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर २०२४ 

रद्दीतील रत्ने : अथांग भारतीय मनाचा रंजक धांडोळा 

  दिनांक २४ सप्टेंबर २०११ या ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राच्या पुरवणीमधील ‘ग्रंथविश्व’या सदरात वरील शीर्षक असलेल्या प्रशांत दीक्षित लिखित  लेखात ‘द इसेन्शियल सुधीर कक्कर’ या पुस्तकाचे परीक्षण आले होते. ते परीक्षण वाचल्यावर हे पुस्तक वाचले पाहिजे असे वाटल्यावरून मी ते परीक्षण कापून ठेवले. या परीक्षणाविषयी मी आपल्याला सांगणार आहेच परंतु आज हे परीक्षण परत वाचल्यावर माझ्या मनात काय विचार आले तेही आपल्या पुढे मांडणार आहे. मी हे परीक्षण … Continue reading रद्दीतील रत्ने : अथांग भारतीय मनाचा रंजक धांडोळा 

पुस्तक परीक्षण : बंध आणि इतर कथा                                                                     

 उमाकांत काशिनाथ घाटे यांचा ‘बंध आणि इतर कथा‘ हा कथासंग्रह मिहाना पब्लिकेशन्समार्फत नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रसिद्ध झालेल्या लेखकाच्या कथांपैकी २० निवडक कथांचा हा संग्रह आहे. लेखकाच्या कथा अंतर्नाद, माहेर, मेनका, किर्लोस्कर, किस्त्रीम, शब्दालय, शब्दगांधार यांसारख्या मातब्बर मासिकांमधून यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह. लेखकाने आपल्या मनोगतात सुप्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकरांचे एक वाक्य उद्धृत केले आहे, “कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी … Continue reading पुस्तक परीक्षण : बंध आणि इतर कथा                                                                     

साहित्य कोडे

कथा, कादंबर्‍या, व्यक्तिचित्रण, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेखन, पत्रकारिता अशा  विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या काही साहित्यकृती अंताक्षरीत गुंफून कोडे घातले आहे अंतर्नादच्या वाचकवृंदाला!  खाली वेगवेगळे गट दिले आहेत. ज्या अक्षराने आधीच्या साहित्यकृतीचा  शेवट होतो त्याच अक्षराने पुढच्या साहित्यकृतीची सुरुवात होते.  ळ आणि ण ऐवजी अनुक्रमे ल आणि न घ्यावे. गाळलेल्या जागा भरायच्या आहेत.   कोड्याची उकल … Continue reading साहित्य कोडे

साहित्य कोडे : उत्तरे

वसंत सरवटे  गट११)बॅरिस्टर२)रुक्मिणी३)नातीगोती गट२१)आल्बम२)महानंदा३)दुर्गी गट ३१)कवडसे२)सरमिसळ३)लग्न४)निवडक ठणठणपाळ गट४१)सारे प्रवासी घडीचे२)चक्र३)कावळे४)लोक आणि लौकिक गट५१) संध्याकाळच्या सावल्या२)संध्याछाया३)कौसल्या Continue reading साहित्य कोडे : उत्तरे

मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४ 

मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४  या वेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत पुन्हा एकदा  दत्तात्रेय  फडके. यापूर्वी त्यांच्या कलेचा आविष्कार आपण नोव्हेंबर २०२३ च्या मुखपृष्ठाच्या स्वरूपात पाहिला आहे. व्यवसायाने ते शरीरविकृतिशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. सूक्ष्मदर्शी यंत्राखाली वेगवेगळे आकार पाहणे, त्यांच्यातील रंगसंगती पाहणे  व त्यातून निदान करणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य आहे.  फडक्यांची नजर सूक्ष्मदर्शी यंत्रातून बाहेर आली आणि आपला परिसर न्याहाळताना  त्यातील वेगवेगळे आकार आणि  रंगसंगती यांतही रमून गेली.  … Continue reading मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४ 

ग्रंथयात्रा – एक प्रवास ९

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यूट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… मराठी कादंबरीची जुनी परिमाणे बदलून टाकणारी आणि अत्यंत गाजलेली ‘कोसला’ ही कादंबरी नेमाडेंनी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी लिहिली. त्यातील अनुभवाचा सच्चेपणा आणि अभिव्यक्तीचा परखडपणा यांमुळे ही कादंबरी तरुण पिढीला अधिकच भावली. आशय आणि … Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास ९

कूटकाव्य

कूटकाव्य ही कोडी आहेत वृत्तबद्ध, संस्कृतप्रचुर.  म्हटलं तर अवघड; पण मजेशीर.  विठ्ठल कवी सहा महिन्यांत कोडी सोडवायला सांगतो. अंतर्नादच्या रसिक वाचकांना एवढा वेळ नक्कीच लागणार नाही.  करा बघू प्रयत्न…  ( उत्तर इतरत्र)  (टीप : पुस्तक जीर्ण झाल्याने काही ठिकाणी  शब्द दिसत नाहीत; तिथे जागा सोडली आहे.  कोडं सोडवताना त्या न कळणाऱ्या शब्दांची  गरज भासत नाही.)  १)शार्दूलविक्रीडित  कोणे एक वनीं विचित्र पुतळा जेवावया बैसला पात्रीं जेवण … Continue reading कूटकाव्य

कूटकाव्य : उत्तरे

१)उत्तर : फुलातला/कमळातला  मध प्यायला बसलेला भुंगा.  पाकळ्या मिटल्याने ज्यात जेवत होता त्याच पात्राने त्याला गिळलं.   २)पहिली ओळ : सह्याद्री पर्वताची कन्या म्हणजे नदी, तिचा पती  समुद्र, त्याचा सुत म्हणजे चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र जेव्हां यौवनात येते,  (म्हणजे मध्यरात्री ) दुसरी ओळ : रामाची स्त्री (सीता), तिच्या नावातला काना काढून टाकला तर उरतं ‘सीत’ (म्हणजेच, शीत (संस्कृत)  म्हणजे गारठा, आम्हांला त्रास देतं सारांश, आम्हांला … Continue reading कूटकाव्य : उत्तरे

मुखपृष्ठाविषयी : सप्टेंबर २०२४

या वेळचे आपले छायाचित्रकार आहेत अद्वैत कुलकर्णी.  पक्ष्यांच्या छायाचित्रणाविषयी बोलताना ते म्हणतात की या प्रकारच्या छायाचित्रणासाठी आत्यंतिक संयम व तंत्रज्ञानावरची हुकमत या दोन्ही गोष्टी कामी येतात. आपले गुरू, पुण्यातील फर्गसन  महाविद्यालयातील प्राध्यापक चंद्रशेखर बापट यांच्याकडून अद्वैत  छायाचित्रणाचे कसब व फिल्म प्रोसेसिंग शिकले.  एमबीए झाल्यानंतर नोकरीनिमित्त सध्या ते ऑस्ट्रेलियात आहेत.  तेथेही त्यांनी  नोकरी सांभाळत आपला हा छंद विकसित केला आहे. या वेळच्या मुखपृष्ठावरचा पक्षी आणि त्याला … Continue reading मुखपृष्ठाविषयी : सप्टेंबर २०२४