रद्दीतील रत्ने १ 

एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज पालघर येथील सुधीर दांडेकर यांचे लिखाण अंतर्नादच्या   माध्यमातून आपण वाचत आहोत.  दांडेकर यांच्याकडे सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीतील वृत्तपत्रांतून किंवा इतर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील कात्रणांचा खूप मोठा संग्रह आहे.   यांतील निवडक  कात्रणांवर आधारित ‘रद्दीतील रत्ने’  ही लेखमालिका सुरू करीत आहोत.  आजचे वृत्तपत्र हे उद्याची रद्दी असते असा एक (गैर) समज;  त्याला अनुसरून रद्दी हा  शब्दप्रयोग केला आहे.  महामहोपाध्याय  दत्तो  … Continue reading रद्दीतील रत्ने १ 

ये है बॉंबे मेरी जान 

मुंबईचा इतिहास भाग ४ ब्रिटिशांचा काळ सन १६६१ ते १८०० मुंबईचा खरा विकास कोणी केला असेल तर तो इंग्रजांनी केला. मागील लेखात आपण पोर्तुगीज व इंग्रज यांच्या दृष्टिकोनांतील फरक समजून घेतला आहे. मुंबईची सात बेटे व त्याला लागून असलेला साष्टी तालुका म्हणजे आताचा बृहन्मुंबईचा प्रदेश १३४ वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यात होता; परंतु त्यांनी मुंबईचा बंदर म्हणून विकास केला नाही. त्यांनी फक्त चर्चेस बांधली; परंतु इंग्रजांना मुंबई … Continue reading ये है बॉंबे मेरी जान 

ये है बॉंबे मेरी जान… भाग ३ 

मुंबईचा इतिहास भाग ३ (पोर्तुगीज शासनाचा काळ इ.स. १५०० ते १६६१)  वरील शीर्षकात लिहिल्याप्रमाणे आपण मुंबई म्हणजे कुलाबा ते माहीम व बृहन्मुंबई म्हणजे वांद्रे ते दहिसर या भागांवरील पोर्तुगीज शासन काळातील इतिहासाचा विचार करणार आहोत. हा इतिहास बघण्याआधी १५व्या आणि १६व्या शतकांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून होणारा व्यापार बघितल्यास भारत किती संपन्न होता याची कल्पना येईल. पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन, कारवार, दाभोळ, चौल  म्हणजे हल्लीचे रेवदंडा व … Continue reading ये है बॉंबे मेरी जान… भाग ३ 

ये है बॉंबे मेरी जान… भाग २ 

बृहन्मुंबईचा इतिहास (२)  आपण ज्या भागाच्या इतिहासाचा मागोवा घेणार आहोत तो भाग ऐतिहासिक काळातील उत्तर कोकण या प्रदेशात येतो. या प्रदेशाच्या सीमा कोणत्या? तर दक्षिणेस चौल बंदरापासून (रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग) उत्तरेला दमणगंगा नदीपर्यंत (जी आज गुजराथमध्ये येते) व पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा. या प्रदेशाचा सर्वात जुना उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या  शतकातील टॉलेमीच्या जॉग्रफीत येतो; याशिवाय एका ग्रीक प्रवाशाने इ.स. साठच्या आसपास लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ … Continue reading ये है बॉंबे मेरी जान… भाग २ 

ये है बॉंबे मेरी जान … भाग १

मुंबई टू बॉम्बैम् टू बॉम्बे टू मुंबई  (अर्थात बृहन्मुंबई परिसराचा इतिहास) या लेखाचे शीर्षक वाचून जरा आश्चर्य वाटेल; परंतु ही सर्व ‘मुंबई’ या शहरावर सत्ता गाजविणाऱ्या निरनिराळ्या राजवटींत प्रचलित असलेली मुंबई शहराचीच नावे आहेत हे आपल्या नक्कीच लक्षात येईल. ‘महाम्बाई’ हे मुंबईची ग्रामदेवता मुम्बादेवीचे मूळ नाव. या महा अम्बा आई याचे बोली भाषेतील रूपांतर किंवा अपभ्रंश म्हणजे मुंबई. बोलताना अशी मोठी नावे किंवा जोडाक्षर असलेले … Continue reading ये है बॉंबे मेरी जान … भाग १

गोष्ट अफगाणिस्तानची (उत्तरार्ध)

श्रीपाद रा. टिकेकर यांनी १९३० साली लिहिलेल्या ‘सिंहाला शह’ या पुस्तकाच्या निर्मितीची हकिकत, आधीच्या लेखातून मी आपल्यापुढे मांडली. या लेखातून वरील पुस्तकात अफगाणिस्तानची जी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व राजकीय  माहिती दिली आहे तिचा गोषवारा मी आपल्यापुढे मांडणार आहे. या माहितीच्या आधारे आजपासून मागील तीस  वर्षांत घडलेल्या घटनांमागील सूत्र लक्षात येईल व पुढे घडणार्‍या घटनांचा अंदाजही करता येईल.  भौगोलिक परिस्थिती: हिंदूकुशपर्वताच्या रांगा अफगाणिस्तानात सर्वत्र पसरलेल्या आहेत. … Continue reading गोष्ट अफगाणिस्तानची (उत्तरार्ध)

गोष्ट अफगाणिस्तानची

इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले, भारताला लुटले, भारताची शिक्षणपद्धती बदलून आपल्याला बौद्धिक गुलाम केले. (ज्या गुलामगिरीतून आपण अजून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही.) आपल्यावर अत्याचार केले वगैरे सर्व गोष्टी अगदी पूर्णत: खऱ्या असल्या; तरी आपल्याला इंग्रजांच्या साहस व अभ्यासूवृत्ती या दोन गुणांचे कौतुक करावेच लागेल; किंबहुना त्यांच्या या दोन गुणांमुळेच ते आपल्यावरती १५० वर्षे राज्य करू शकले असे मला वाटते. इंग्रजांनी भारताच्या भूगोलाचा, इतिहासाचा,जातिधर्माचा, चालीरिती, … Continue reading गोष्ट अफगाणिस्तानची

धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय

आज आपण डोळसपणे आजूबाजूला बघितले तर असे लक्षात येईल की हल्ली साईबाबा, स्वामीसमर्थ, गजानन महाराज यांच्या मंदिरांची संख्या वाढते आहे. तसेच सिद्धिविनायक, लालबागचा गणपती यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे जात आहेत. मठ व मंदिरांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत आहेत.  या निरीक्षणावरून,’भारतीय समाज धार्मिक होतो आहे,’ असे म्हणता येईल का? जर समाजात धार्मिकता वाढत असेल तर समाजातील … Continue reading धार्मिकता व आध्यात्मिकता म्हणजे काय