संपादकीय : ऑगस्ट २०२४
जुगलबंदी अशीही… डावे उजवे ते मुक्त आणि बद्ध! फरीद झकारिया माल्कम ग्लॅडवेल माल्कम ग्लॅडवेल आणि फरीद झकारिया ही अमेरिकन साहित्यवर्तुळातील दोन मातब्बर नावे. … Continue reading संपादकीय : ऑगस्ट २०२४
जुगलबंदी अशीही… डावे उजवे ते मुक्त आणि बद्ध! फरीद झकारिया माल्कम ग्लॅडवेल माल्कम ग्लॅडवेल आणि फरीद झकारिया ही अमेरिकन साहित्यवर्तुळातील दोन मातब्बर नावे. … Continue reading संपादकीय : ऑगस्ट २०२४
विविध व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या आपल्या संघटना हे आपल्या समाजजीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनल्या आहेत. सनदी लेखापाल, अभियंते, वैद्यक-व्यावसायिक, वकील यांच्या संघटना आपापल्या सदस्यांच्या हितरक्षणासाठी जागरूक असतात. अशा प्रकारच्या संघटनांचा हेतू काय असावा? १ आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती, येणारे नवीन ज्ञान आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवून त्यांना अद्ययावत ठेवणे – यासाठी प्रदर्शने, कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन करणे. २ सभासदांना व्यावसायिक विकासाला मदत करणे. ३ सरकारी धोरणे व … Continue reading संपादकीय जुलै २०२४ : संघटन कशासाठी?
लोकशाहीचा उत्सव आपण नुकताच साजरा केला. निवडणुकीचा निकाल लागला. त्याची व्यक्तिसापेक्ष चिरफाड आपण सध्या करत आहोत. हा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला. ‘उत्सव’ हा संस्कृत शब्द आहे. त्याला ‘जत्रा’ हा मराठी प्रतिशब्द चालेल का? या विषयावरती एखादा एक्झिट किंवा ओपिनियन पोल घेऊ या का? आम्ही तो पोल रीग करून जत्रा हा प्रतिशब्द चालेल असे उत्तर मिळवले आहे. असो. जत्रा म्हटले की … Continue reading संपादकीय : संध्याकाळी सहानंतर तुम्हांला कोण आहे?
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच म्हणजे गेल्या मार्च महिन्यात पुढील २५ वर्षांसाठीचे भाषा धोरण जाहीर केले आहे. या बाबत १२ पानी शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. अर्थातच निर्णयाची भाषा खास शासकीय मराठी आहे. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. द्विभाषकापासून हे मराठी भाषिक राज्य निर्माण झाल्याने आता मराठीला बरे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली. हे बरे दिवस यायचे असतील तर एकंदरीतच सर्व … Continue reading संपादकीय : हाक मायमराठीची
प्रतिवर्षी जानेवारीत जयपूर शहर एका वेगळ्याच कारणाने सांस्कृतिक विश्वाच्या केंद्रस्थानी येते – निमित्त असते तेथे भरणाऱ्या जयपूर लिटफेस्टचे. नुसत्या भारताचेच नाही; तर एक प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेण्यात या आयोजनाला यश आले आहे. सुरू होण्याच्या आधी दरम्यान आणि नंतरदेखील सर्व प्रसार माध्यमे या फेस्टिवलला चांगली प्रसिद्धी देतात. आयोजनादरम्यान सादर झालेले अनेक चांगले कार्यक्रम नंतर विविध समाजमाध्यमांतून पाहायला मिळतात. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढते आहे. हाही … Continue reading संपादकीय : जयपूर लिटफेस्ट आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
केंद्र सरकारने आजवर तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया व तेलगू या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेलाही हा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न चालू आहेत. असा दर्जा मिळाल्याने त्या भाषेला राजमान्यता मिळाली असे समजले जाते व भाषेच्या उन्नतीसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. हा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाचे काही निकष आहेत. या निकषांचा अभ्यास करून … Continue reading संपादकीय : आणखी एक समिती अभिजात मराठीसाठी
आम्ही लटिके ना बोलू! सोमवार दि. ४ व मंगळवार दि. ५ मार्च २०२४ रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक येथे ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शेतीउद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात आयोजित संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक भानू काळे भूषविणार असून नाम फाउंडेशनचे संस्थापक,आघाडीचे … Continue reading संपादकीय : फेब्रुवारी २०२४
हल्ली कुठल्याही छोट्या गावात गेले तर गावातील तरुणांचे शिक्षण व रोजगारासाठी मोठ्या शहरांमधून स्थलांतर झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. हे स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम हा एक स्वतंत्र विषय आहे. नुकतेच पर्यटनासाठी कोल्हापूरजवळील अंबाघाटात गेलो होतो. घाट व कोकण यांच्या सीमारेषेवर असलेला हा प्रदेश निसर्गरम्य आहे. पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरचा वेढा तोडून विशाळगडाकडे केलेली कूच हा एक अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण या … Continue reading संपादकीय : दुर्मीळ उलटी गंगा
The small wisdom is like water in a glass : clear, transparent, pure. The great wisdom is like the water in the sea : dark, mysterious, impenetrable – शहाणीव ही ग्लासातल्या निवळशंख पाण्यासारखी असते; तर शहाणपण अथांग गूढ सागरासारखे – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यातील अनेक पदरी अनुबंधातील एक भरजरी पदर म्हणजे महाराष्ट्राचे गुरुदेवांवर आणि त्यांच्या साहित्यसृष्टीवर असणारे अतोनात प्रेम. पुलंमुळे हे प्रेम … Continue reading संपादकीय : रत्नपारखी रत्नागिरी
दैव जाणिले कुणी? अर्थात भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे जाणणे अशक्यप्राय आहे असे जुने जाणते वेळोवेळी सांगत असतात; तरीही जिज्ञासा आपल्याला काही गप्प बसू देत नाही. वर्तमानापेक्षा भविष्य अधिक सुखकारक असण्याची आशा हा माणसाला वर्तमान सोसण्याची ताकद देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. एका मराठी चित्रवाहिनीवर भविष्याचे मंथन/ सूचन करणारा एक कार्यक्रम होतो. तो बराच लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम एवढा का गाजतो आहे ते जाणून … Continue reading संपादकीय – वेध भवितव्याचा