संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

नळराजाचं कौतुक करताना रघुनाथ पंडितांना विलक्षण काव्यस्फूर्ती येते. पुन्हा पुन्हा नळाची स्तुती करताना रघुनाथ पंडित विविध दृष्टान्त, उपमादी अलंकार गुंफत राहतात.  या अलंकारांचं आणि स्तुतीचं निधान एकच असलं, अलंकारही पुनः पुन्हा तेच वापरले असले तरी कल्पनाचातुर्यामुळे ते रंजक ठरतात – कसे ते पाहू या!   प्रतीप अलंकार ज्याची उपमा द्यायची त्याचंच खुजेपण, कमीपण दाखवून देत उपमेयच कसे वरिष्ठ आहे हे दाखवत त्याचे कौतुक करणारा हा अलंकार!  … Continue reading संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

 संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

रघुनाथ पंडित भाग २ आधीच नैषधकथा नवनीत भेलाहोता अलंकरणरूप इच्या जिभेला… ||१०४||रघुनाथ पंडितांच्या काव्यपंक्तीतील हा छोटासा भाग नलदमयंती स्वयंवराचं मूळ काव्य आणि रघुनाथ पंडितांनी तिच्यावर चढवलेल्या अलंकारांचं रूप दाखवतं. लोण्याचा गोळा असावा अशी ही मृदू कथा आणि तिने परिधान केलेले अलंकार आणि आभूषणं!अलंकार हा शब्द कसा आला? संस्कृतात अलम् हे भूषणवाचक अव्यय आहे. कृ म्हणजे करणे — अलंकृत करणे. साध्या वाक्यांना अलंकार चढवले की मूळ … Continue reading  संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला 

संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १

दमयंती स्वयंवराच्या एका प्रतीवर लिहिलेलं नाव ‘चंदावरकर रघुनाथ’  म्हणजे ते चंदावरचे राहणारे असावेत!  काहींच्या मते तंजावरला पूर्वी चंदावर म्हणत;  म्हणजे रघुनाथ पंडित तंजावरच्या मराठी मंडळींपैकी असावेत.   काहींच्या मते  शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील पंडितराव म्हणजेच न्यायशास्त्री, राजव्यवहारकोशकर्ते अशी  राजकीय पदे भूषवत असतानाही आंतरिक काव्यप्रेरणा टवटवीत राखणारे हे रघुनाथ पंडित! काहींच्या मते त्यांचे गाव रायगड जिल्ह्यातील चौल! आडनाव मनोहर. चौलच्या फफे मनोहर घराण्यातही याची माहिती नाही.  मग पंडितांचे मूळ … Continue reading संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १

पत्रकारदिनानिमित्त कोडे

नराणां नापितो धूर्तः पक्षिणां चैव वायसः चतुष्पदां शृगालस्तु  स्त्रीणां धूर्ता च मालिनी नारद, नापित आणि माळणी यांना  घटनांचा प्रसार  करणारे असं संबोधलं आहे.   बातम्या मिळवण्यासाठी हेरांची नेमणूक करणे अगदी आत्ताच्या काळातही महत्त्वाचे आहे. मोगल काळात त्यांना वाक़िआ नवीस म्हणत असत. वाक़िआ म्हणजे घटना आणि नवीस म्हणजे लिहिणारा. घटना लिहिणारे म्हणजे अर्थातच तत्कालीन पत्रकार.  (फडनवीस – इथे पुढे अनुनासिक आल्याने अरबी शब्दाला संस्कृत नियम वापरून ( … Continue reading पत्रकारदिनानिमित्त कोडे

पत्रकार कोडे उत्तर

१)तानूबाई बिर्जे २)न. चिं. केळकर ३)ग. त्र्यं. माडखोलकर ४)नानासाहेब परुळेकर ५)बापूसाहेब भिशीकर ६)वि. वि. करमरकर ७)प्रमोद नवलकर ८)गोविंदराव तळवलकर ९)बाबासाहेब आंबेडकर १०)कृष्णराव भालेकर ११)नीळकंठ खाडिलकर १२)दत्तू बांदेकर १३)प्र.के.अत्रे १४)बाळासाहेब ठाकरे  १५)ग. वा. बेहेरे Continue reading पत्रकार कोडे उत्तर

संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१४)

विठ्ठल कवी आणि चित्रकाव्यबंध विठ्ठलाने अलंकार, वृत्तं आणि कथांनी कवितासुंदरी सजवली. त्याने चढवलेले आणखी एक काव्यलेणे म्हणजे चित्रकाव्य.एखाद्या वस्तूची, विषयाची, आकृतीची मनात कल्पना करून त्या कल्पनेला अनुरूप अशी शब्दरचना करणे –विवक्षित वर्ण ठरावीक ठिकाणी आणणे आणि ती शब्दरचना चित्ररूपात रसिकांपुढे ठेवणे याला कृत्रिम काव्य समजलं जात असलं तरी विठ्ठलाची नवीन काही देण्यामागची धडपड थक्क करून जाते.चित्रकाव्यबंधाचा अर्थ अगदी सोपा आहे; पण रचना अवघड आहे. बंधनात असलेलं … Continue reading संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१४)

साहित्य कोडे डिसेंबर २०२४

१३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबंद नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले.  शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील अनुभवप्रवास … Continue reading साहित्य कोडे डिसेंबर २०२४

साहित्यकोडे

साहित्यकोडे  १३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबद्ध नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले… शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील … Continue reading साहित्यकोडे

साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

१३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबंद नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले.  शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील अनुभवप्रवास … Continue reading साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

साहित्यकोडे उत्तर – डिसेंबर २०२४

डॉ. विद्याधर पुंडलीक साहित्यकृती कोडेउत्तर१)सामोरी२)आजी शरण येते३)इतिहासाने लपविलेली एक कथा४)गुप्त वाट५)वाटा६)माळ७)दवणा८)विपरीत काही झालं नाही९)शेवटीऽऽ काय१०)गाय११)सती१२)अखेरची रात्र१३)पोपटी चौकट१४)माता द्रौपदी१५)कोनाडा१६)लांडगा आला रे आला१७)चकवा१८)चक्र१९)मांगल्याच्या ध्यासाचा नाजूक बळी२०)दूर कोपऱ्यातील बैरागी चाफा२१)अर्धूक२२)प्रवास२३)माझी झोपडी२४)अपार२५)जेव्हा पहाट होते२६)बोलावणं Continue reading साहित्यकोडे उत्तर – डिसेंबर २०२४