साहित्यकोडे

साहित्यकोडे 

१३ डिसेंबर २०२४

साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता. 

मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबद्ध नाही. 

 अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले…

शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील अनुभवप्रवास घडवणारी. 

“तुला काय वाटतं, आजी हरेल का आजोबा हरतील?” 

गोटीने आपला शेपटा नाकावर ओढीत म्हटले, “ त्यात  काय तुझे आजोबा आत्ता परत येतील…”

मी चिडून म्हटले, “माझी शपथ भीमाची अन् मारुतीची आहे. तुझ्या त्या बायकी कृष्णाची नाही. 

 बायकांत पुरुष लांबोडा लांबोडा

गोपींतला देव लंगडा लंगडा”

असं निरागस बालविश्वही ते अवखळ मृदूपणे रेखतात. 

 पुंडलिकांच्या काही साहित्यकृती खाली दिलेल्या आहेत. त्या एकात एक गुंतल्या आहेत.  उदा. 

मी आणि पेंडसे

प्रिय  आना

याचं  प्रिय पेंडसे, आना आणि मी असं केलेलं आहे. 

तर शोधून काढा बरं पुंडलिकांच्या विविध साहित्यकृती. 

आस्वाद घेऊ या त्यांच्या  विलक्षण प्रतिभाशक्तीचा. 

जेव्हा  पहाट होते माझी नाजूक द्रौपदी आजी सामोरी येते.  इतिहासाने अर्धूक लपविलेली अखेरची पोपटी गुप्त वाट – एक शरण चौकट – अपार कथा-चक्र प्रवास-  माळवाटा, चाफा, दवणा… 

दूर कोपऱ्यातील सती-माता झोपडी,  कोनाडा,  लांडगा-बळी – गाय – मांगल्याच्या विपरीत ध्यासाचा चकवा –  बैरागी बोलावणं… आला रे आला

शेवटीऽऽ झालं  काय  

काही नाही 

  रात्र…  

Author

Leave a Reply