प्रश्नोपनिषद : जून २०२५ 

मंडळी, 

 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

बंध- अनुबंध ‘या आपल्या आत्मचरित्रात लेखिका कमल पाध्ये यांनी समाजकार्याच्या प्रवृत्तीच्या संदर्भात  काही लिहिले आहे.

‘खरं म्हणजे प्रकल्प करत असतानाच ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. समाजकार्याबद्दल भरपूर मोल घेऊन कार्य करणं समाजकार्याच्या पाश्चात्त्य  कल्पनेत मानाचं मानलं जातं. आम्ही काहीही न घेता किंवा केवळ खर्चापुरते थोडे पैसे घेऊन काम करतो याचं पाश्चात्त्यांना कौतुक वाटतं… पण भारतात समाजकार्याची कल्पना त्यागावर आधारलेली असल्यानं त्याचं मोल करणं कमीपणाचंच नव्हे तर समाजकार्याच्या भावनेलाच छेद देणारं आहे, असे संस्कार आपल्या स्वातंत्र्यलढ्यापूर्वीपासून लोकांच्या मनात ठसले आहेत. त्यामुळं प्रशिक्षित कार्यकर्त्यांची पैशाची अपेक्षा अनेकांना अयोग्य वाटते. तसेच कित्येकदा त्यागाच्या भावनेतून केलेलं समाजकार्य कार्यकर्त्याला अहंकारी बनवतं. हा त्यागाचा अहंकार समाजकार्याच्या ज्ञानालाही कमी लेखतो आणि मग तो संघटनेच्या व कार्याच्या वाढीलाच बाधक ठरण्याचा संभव असतो.’ (बंध-अनुबंध पृष्ठ क्रमांक २१९  लेखिका कमल पाध्ये)

कमलताईंच्या  या मताबद्दल आपल्याला काय वाटते? 

आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा 

jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता. 

आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू  शकता. 

आणि हो, 

 या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता. 

संपादक 

Author

One thought on “प्रश्नोपनिषद : जून २०२५ 

  1. मी कमलाबाईंच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. केवळ त्यागाच्या भावनेवर आधारलेल्या समाजकार्यात त्यांनी सांगितलेले दोष निर्माण होऊ शकतात.
    शिवाय या प्रकारचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत टिकत नाही अशी उदाहरणे खूप दिसतात. याऊलट जेथे समाजकार्य हे संस्थात्मक स्वरूप घेते तेव्हा ते अधिक विस्तृत प्रमाणात होताना दिसते. तसेच पुढची पिढी त्यातून स्फूर्ती घेऊन त्यात सहभागी झाल्याचे दिसून येते.

Leave a Reply