जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शब्दकोडे : वृक्षवल्ली आम्हां सोयरी

खाली वृक्ष/वेली/भाज्यांचे वर्णन दिले आहे; त्यावरून नावे ओळखायची आहेत. वर्णाक्षरांचे गट दिले आहेत – म्हणजे   

प ते  म  विभागात पिंपळी, मेंदी असतील. सगळ्याच अक्षरांपासून नावे आहेत असे नाही. 

महत्त्वाचं म्हणजे या शब्दांमध्ये एका अक्षरावर अनुस्वार आहे – तो शब्दातील कोणत्याही अक्षरावर असेल. वर्णनापुढे जेवढ्या रेघा आहेत तितकी अक्षरे आहेत  आणि  काही ठिकाणी यमकही जुळवलेलं आहे; तर चला वृक्षवल्लींना भेटायला! 

ते विभाग

१)लाकूड जड अन् रंगीत लाल 

  धागे देते याची साल _ _ _

२)मन म्हणत नाही खाणं  पुरे आता, थांबा

मी तर सर्वांचा लाडका _ _(यमक) 

३)साबण  तेल आपटबार

असा मोठा कारभार

नाव  नाही सोपं अगदी

मराठीत हिंगणबेट – संस्कृतात (यमक) 

_ _ _

४)उच्चारताना होतो ओठांचा चंबू

मी तर आहे _ _ _ _(यमक) 

५)खारींचं खोपट, दाराची चौकट

स्त्रीची वेस, येतंय ओळखू? की लागली ठेच 

_ _ _

६)पोट करतंय बंड

आलोच धावून मी तो _ _ _

(यमक) 

ते वर्ग

७)काळाभोर रंग अन् काटेरी वेणी

कोंबडा कोंबडीच्या खेळाची गाते गाणी _ _ _ _

८)सगळ्या माझ्या भावंडांचं सारखंच वजन

सोनं मोजायला माझंच उपयोजन

_ _

ते वर्ग 

९)फुलं खेळती फांदीवर 

 फारशी नाही  त्यांची ओढ

महत्त्वाचं माझं सुगंधी खोड

_ _ _

१०)कधी पांढरा कधी लाल 

जात माझी ‘पाणेरी’ 

उन्हाळा बाधत नाही, आनंदतात खाणारी _ _

११)पिवळी गोंडस फुले साजिरी

फुलती येता दसरा जवळी _ _

ते वर्ग

१२)रानमेवा वेचायाला म्हातारी अन् तरणी

येई उन्हाळा जेव्हा 

फळांनी भरते  _ _ _ (यमक) 

१३)एकसारखे  दिसती

लालचुटुक मोती

त्यांची उपमा खाशी

सुंदरशा रदनांसी _ _ _

ते वर्ग

१४)तारुण्यात हिरवेगार 

पांढऱ्या रेषा बहारदार

कोवळे नाही खुडले तर 

रागावेल आतून  लालेलाल _ _ _

१५)गोलमटोल वाटोळा

शुभ्र पांढरा भोपळा 

नावात माझ्या आहे देव

पट्कन ओळखा नाही वेळ 

_ _ _ _ _ 

१६)ताप ताप तापले

अंगांग  फुलले

पोटात साठवून ठेवले पाणी

जवळ आलात तर टोचून काढी

_ _ _ _

ते वर्ग

१७)फुलून फुलून कहर

     लालचुटुक बहर _ _ _

१८) ‘रोग जाय दुधेसाखरे। तरी _ _ कां पियावा ।’

इथे दोन अक्षरीऐवजी ५ अक्षरी शब्द त्याच कुळातला. 

_ _ _ _ _

१९)आला पावसाळा रानभाज्यांचे हिरवेगार रंग

वाल घालून करू चला खमंग

 _ _ _(यमक) 

२०)शुभ्र पांढऱ्या पाच पाकळ्या 

मधे विराजे परागमुकुट

श्रीगणेशाचे स्थान म्हणे हे

सोडवा बरे हे  कूट _ _ _

ते ज्ञ वर्ग 

२१)लाल फळे ही लगडुन कैसा उन्हाळ महिना आला 

गाऊ _ _ _ चे गाणे लल्लल लल्लल ला ला

२२)निळसर तांबडे फूल वाळते

मसाल्यास ते  सजवुन जाते

वरती दिसती चारही शिंगं

माझे नाव आहे  _ _ _(यमक) 

२३)पहिली दोन अक्षरे एकच वर्णी

चौथं आणि पहिलं जंगली प्राणी 

स्थान माझं घरी आजीबाईंचा बटवा

चला लवकर लवकर माझी ओळख पटवा _ _ _ _

२४)दुसरं तिसरं अक्षर तो गरगर फिरतो

तिसरं दुसरं अक्षर चटका देतो

होतोय याचा उलगडा

अहो मी तर उपासाचा लाडका 

_ _ _(यमक) 

२५)दुसऱ्या तिसऱ्या अक्षराची ऊब पांघरू

पहिल्या तीन अक्षरांत भटकून येऊ

काश्मीरला भटकताना फळांचा गंध

मटकवू पट्कन  _ _ _ _ _(यमक) 

२६)पचनात याचा मोठा मान

फोडणीत याचं दुसरं स्थान

जेव्हा ना दे कोणी मान

तेव्हा म्हणीत गुंफती  यास _ _

उत्तर इतरत्र..

Author

Leave a Reply