ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
मराठीतील प्रतिभासंपन्न कवी कुसुमाग्रज यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह १९४२ साली प्रसिद्ध झाला आणि त्याने वाचकांना वेड लावले. त्यातील कविता तरुण पिढीच्या ओठांवर खेळू लागल्या आणि त्यांत व्यक्त झालेल्या आवेशाने तरुणांना स्फुरण चढले. ज्ञानपीठ पारितोषिकाचे मानकरी असलेल्या कुसुमाग्रजांच्या या काव्यसंग्रहाची ओळख करून घेऊ या.
या व्हिडिओमधून त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये ऐकू या डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांच्याकडून.

अंक खूप आवडला.वेगवेगळे विषय घेऊन लेख निवडले आहेत त्यामुळे वाचताना मजा आली.