ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर वेगवेगळे मराठी साहित्य प्रकार मांडत आहेत. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
पंडिती परंपरेतील शेवटचे आणि सर्वांत प्रसिद्ध कवी मोरोपंत यांनी ‘श्लोककेकावली’ लिहिली. स्वतःचा उद्धार करण्यासाठी देवाची केलेली आर्त विनवणी हा या काव्याचा विषय आहे. या काव्याचा विशेष म्हणजे मोरोपंत अतिशय विश्वासाने आणि सलगीने यात देवाबरोबर संवाद साधतात. जणू देव त्यांचं बोलणं ऐकतो आहे, त्यांच्यासमोर साक्षात उभा आहे आणि ते त्याला कधी विनवतात, कधी टोमणा मारतात तर कधी त्याच्याशी भांडतातसुद्धा. अठराव्या शतकात मोरोपंतांनी लिहिलेली श्लोक केकावली आजही किती उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी अवश्य पहा हा व्हिडिओ.
