‘सत्य’कथेतील १९६० ते ७० या दशकातल्या लघुकथांचा ‘सत्त्वकथा’ हा संग्रह आहे. लघुकथा आणि अनोळखी कथालेखक हे मुद्दे; तसेच एकच परिणाम साधणारी लघुकथा आणि तिचा प्रभाव असे प्रयोजन ठेवून हे संपादनाचे काम झालेले आहे – मुक्ता गोडबोले, संचालक, देशमुख आणि कंपनी.
लेखक, जगभरातील व्यंगचित्रांचे साक्षेपी अभ्यासक, ज्येष्ठ कथालेखक मधुकर धर्मापुरीकर व स्नेहा अवसरीकर यांनी ‘सत्यकथां’मधील निवडक कथांच्या संग्रहाचे संपादन करून सिद्ध केलेल्या या संग्राह्य पुस्तकाचे स्वागत!
