सप्रेम नमस्कार
‘शितावरून भाताची परीक्षा’ हा लेख वाचण्यात आला. तसे बघता माझा आणि साहेबाच्या देशाचा संबंध १९७०पासून जवळजवळ ३० वर्षे होता. मी ज्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होतो त्याची एक शाखा लंडनजवळ होती; त्यामुळे अनेक वेळा जाण्याचा योग आला. आता २५ वर्षे झाली; पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले हे खरे. आता वर्णन केल्याप्रमाणे व मी ज्या ताज्या बातम्या youtube वर बघतो त्याप्रमाणे साहेबाला आता इस्लामचा तडाखा पाहायला मिळू लागला आहे. ६ टक्क्यांवर मुस्लीम लोकसंख्या झाली असून माझ्या माहितीप्रमाणे धार्मिकतेचा व मध्ययुगीन पद्धतीचा अतिरेक होणार हे नक्की असे माझे ठाम मत आहे. सध्याच्या सरकारला मुसलमानांनी भरपूर पाठिंबा दिला असून सध्याचे पंतप्रधान लोकांमध्ये फारच अप्रिय होऊ लागले असून त्यांना साहेबी भाषेतील शेलका अहेर दररोज मिळत आहे.
मी इतिहास अभ्यासक आहे. इंग्रजांनी भारत तसेच आशिया, आफ्रिका खंडांतील देशांत अनंत अत्याचार करून सर्व गुलाम देशांची संपत्ती लुटली. याचा दुसरा भाग म्हणजे दुसऱ्या महायुद्धावेळी पंतप्रधान चर्चिल यांनी आपल्या देशाची प्रचंड निंदा-नालस्ती केली. ते जरी त्या देशाला देवासमान असले तरी ते भारताचा कर्दनकाळ होते असे नाइलाजाने म्हणणे भाग आहे. आता पापाचा घडा भरला असून अत्याचार म्हणजे काय हे साहेबाला कळले तर फार बरे होईल. बऱ्याच युरोपीय देशांत आता इस्लामची मुजोरी वाढली असून त्याही देशांना अत्याचार म्हणजे काय ते लवकर कळेल असे सध्याचे चित्र आहे.
मला एका साहेबाच्या देशात वाढलेल्या भारतीय माणसाने जाहीर आव्हान दिल्याने मी याच देशातील ३ प्रसिद्ध तांत्रिक संस्थांची मान्यता आवश्यक त्या सर्व लेखी व तोंडी परीक्षा देऊन मिळवून दाखविली व chartered हा किताब मिळविला. याचा मला अभिमान आहे.
आता साहेबाची सद्दी संपली तरीसुद्धा विजय मल्याला काही ना काही न्यायिक बाब पुढे करत १० वर्षे झाली तरी भारताच्या स्वाधीन करत नाहीत; म्हणजेच अजून मस्ती पुरती उतरली नाही हे दिसून येते.
प्रो. मा.वि.वैद्य
EX Consulting & Chartered Engineer, (Electrical and Chemical). Chartered Environmentalist (U.K.), Environmental Auditor (U.K). Certified Energy Auditor.
Retired executive Director of German Multinational Company.
